T20 World Cup trophy : 'टीम इंडियाची लाज वाटते...', वर्ल्ड कपची ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने वाद! 1983 चा चॅम्पियन का भडकला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kirti Azad On T20 World Cup trophy In Hindu temple : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. 1983 च्या चॅम्पियन खेळाडूने अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
T20 World Cup trophy Controversy : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर संपूर्ण भारतात दिवाळी साजरी केली गेली. मोठ्या जल्लोषात टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक झालं. अशातच आता ट्रॉफी जिंकल्यानंतर एक घडामोड घडली, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सूर्यकुमार यादव, गौतम गंभीर आणि जय शहा यांनी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ट्रॉफी थेट अहमदाबादच्या हनुमान मंदिरात नेली. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. ट्रॉफी फक्त हिंदू खेळाडूंनी जिंकवली का? ख्रिश्चन असलेल्या संजूचा काही रोल नव्हता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ट्रॉफी मशीदमध्ये का नेली नाही? चर्च का नाही?
1983 मध्ये जेव्हा आम्ही कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आमच्या संघात हिंदू मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन होते. आम्ही आमच्या धार्मिक जन्मभूमी भारत हिंदुस्थानमध्ये ट्रॉफी आणली. एका धर्माच्या नावाखाली भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेली ट्रॉफी का ओढली जात आहे? ट्रॉफी जर मंदिरात नेली जात असेल तर मशीद का नाही? चर्च का नाही? गुरुद्वारा का नाही? असा सवाल किर्ती आझाद यांनी विचारला आहे.
advertisement
ख्रिश्चन असणाऱ्या संजूने महत्त्वाची भूमिका
टीम इंडिया हा संघ भारताचं प्रतिनिधित्व करतो. सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचा नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला. सिराजने कधीही मशिदीत नेलं केली नाही. संजूने कधीही चर्चमध्ये नेलं नाही. ख्रिश्चन असणाऱ्या संजूने महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता, असंही आझाद म्हणाले.
advertisement
ट्रॉफी एकाही धर्माच्या वाट्याची नाही
दरम्यान, टीम इंडियाने जिंकलेली ही ट्रॉफी प्रत्येक धर्माच्या 1.4 अब्ज भारतीयांची आहे, एकाही धर्माच्या वाट्याची नाही, असंही किर्ती आझाद यांनी यावेळी म्हटलं आहे. तर अनेकांनी किर्ती यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. सोशल मीडियावर देखील अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रॉफी मंदिरात नेण्याची घाई का होती? मध्यरात्री ट्रॉफी हनुमान मंदिरात नेण्यात का आली? असा सवाल विचारला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 7:28 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup trophy : 'टीम इंडियाची लाज वाटते...', वर्ल्ड कपची ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने वाद! 1983 चा चॅम्पियन का भडकला?






