Shani Asta: अपेक्षा नसताना आशेचा किरण! 13 मार्चपासून कुंभसहित 5 राशींना दिलासा; दुहेरी आनंद वार्ता
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाच्या स्थितीला फार महत्त्व दिलं जातं. त्याच्यामध्ये झालेला थोडासाही बदल राशीचक्रावर मोठा परिणाम करतो. शनी ग्रह 13 मार्च 2026 रोजी मीन राशीत अस्त होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्म, शिस्त आणि न्यायाचा कारक मानला जातो. शनिदेव हे खरंतर कोणालाही विनाकारण त्रास देत नाहीत, ते फक्त आपल्या कर्मांनुसार फळ देतात. ही घटना साडेसाती आणि अडीचकी भोगणाऱ्या लोकांसाठी एक मोठा दिलासा देणारा काळ असू शकतो.
advertisement
सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींवर साडेसाती सुरू आहे, तर सिंह आणि धनु राशींवर शनिची अडीचकी सुरू आहे. कुंभ राशीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा, मीनवर दुसरा टप्पा आणि मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा आहे. शनि अस्त झाल्यामुळे या साडेसाती आणि अडीचकीच्या नकारात्मक प्रभावात काही प्रमाणात घट होईल, ज्यामुळे संबंधित राशींच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल.
advertisement
या काळात तुमचे कर्म अतिशय महत्त्वाचे ठरतील. जर तुम्ही प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत असाल, तर तुम्हाला न्याय मिळेल. मात्र, जर नकळत कोणावर अन्याय झाला असेल, तर या दिवसांत सावध राहणे गरजेचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाचे मन दुखवले आहे, तर आता मनापासून क्षमा मागण्याची ही उत्तम वेळ आहे. घाबरण्यापेक्षा आपल्या चुकांची कबुली देणे अधिक फलदायी ठरेल.
advertisement
advertisement
हा काळ आध्यात्मिक जागृतीसाठी आणि आत्मचिंतनासाठी खूप चांगला आहे. या दिवसांत जास्तीत जास्त शांत राहून आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. दानधर्म करणे शनिदेवांना लवकर प्रसन्न करते. तसेच ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः किंवा ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप करणे तुमच्या मानसिक शांततेसाठी खूप फायदेशीर ठरेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






