advertisement

Weather Alert: महाराष्ट्रात ‘हिट वेव्ह’चं संकट, कोकण ते विदर्भ अलर्ट, 48 तास महत्त्वाचे!

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात मार्चमध्येच मे महिन्यासारखी उष्णता जाणवत आहे. आज हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
1/7
महाराष्ट्रात सध्या तीव्र उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, मार्च महिन्यातच उष्णतेची लाट सारखी स्थिती आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 8 मार्च रोजी राज्यात कुठेही ढगाळ हवामान किंवा अवकाळी पावसाची शक्यता नाही. सर्वत्र शुष्क, उष्ण ते अतिउष्ण तर किनारी भागात दमट हवामान राहील. कमाल तापमानात सामान्यापेक्षा 4-8 अंशांपर्यंत वाढ झाली आहे. रविवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचं संकट कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज देखील हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. मुंबईत कमाल तापमान 31-35 अंशांवर राहील. तर किमान तापमान 24-26 अंश सेल्सिअस असेल. 8-9 मार्चला पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत तापमानात मोठी वाढ झाली आहे. या भागात उष्ण आणि शुष्क हवामान जाणवत आहे. आज 34-38 अंश कमाल तर 18-22 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान राहील. पुणे परिसरात देखील उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती असून सामान्यापेक्षा जास्त तापमान आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार परिसरात उष्ण आणि शुष्क वातावरण आहे. कमाल तापमान 36-39 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवलं गेलंय. पुढील आठवड्यात देखील तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र मार्चमध्येच निर्माण झाले आहे. काही ठिकाणी कमाल तापमान चाळीशी पार गेलं आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांत सरासरी 37-40 अंशांच्या दरम्यान कमाल तापमान नोंदवलं जाईल.

6/7
विदर्भात सर्वाधिक तीव्र उष्णता आहे. नागपूरसह इतर जिल्ह्यांत पारा चांगलाच चढला असून कमाल तापमान 41 अंशांपर्यंत नोंदवलं गेलंय. आज 38 ते 41 अंशांच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा परिसरात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

7/7
दरम्यान, रविवारी राज्यातील कोणत्याही भागात पावसाचा इशारा नाही. पुढील काही दिवसांत कमाल तापमान 2-3 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, तसेच भरपूर पाणी प्यावे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement