Amitabh Bachchan: बिग बी बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली आणखी एक प्रॉपर्टी, किती रक्कम मोजली माहितीये?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
अमिताभ बच्चन सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये बिग बींनी तिसरी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी 2.67 एकरची 35 कोटींना जमीन विकत घेतली आहे.
advertisement
यापूर्वी सुद्धा बिग बींनी अयोध्येमध्ये जमीन खरेदी केली आहे. जमीन खरेदी करण्याचीही त्यांची पहिली वेळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी रिअल इस्टेट कंपनी 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' (HoABL) यांच्याकडून अमिताभ यांनी ही जमीन खरेदी केली आहे. बिग बींची ही अयोध्येतील सर्वात मोठी पण तिसरी इन्व्हेस्टमेंट मानली जातेय.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी खरेदी केलेली नवीन जमीन 'द सरयू' नावाच्या प्रोजेक्टच्या शेजारीच आहे. तो प्रोजेक्ट जवळपास 75 एकर जमिनीच्या परिसरामध्ये पसरला आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये बिग बींना याचा अधिकाधिक फायदा होणार, हे मात्र नक्की. दरम्यान, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आगामी काळात अयोध्या शहर फार महत्त्वाचे समजले जात आहे.
advertisement
बिग बींची कंपनी एबी कॉर्पोरेट लिमिटेडचे मॅनेजमेंट डायरेक्टर राजेश यादव यांनी जमीन खरेदीची कागदपत्रे तयार केलेली आहेत. रिअल इस्टेट कंपनीचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणतात की अमिताभ बच्चन यांच्या गुंतवणुकीमुळे भविष्यात अयोध्या हे शहर गुंतवणूकीच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर बनू शकते. अयोध्यासारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक शहरात गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे.
advertisement
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, मे 2025 मध्ये, त्यांनी सुमारे 40 कोटी रुपयांना 25,000 स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली होती. तर, 2024 मध्ये, त्यांनी "द सरयू" प्रोजेक्टमध्ये सुमारे 10,000 स्क्वेअर फूट जमीन अंदाजे 14.5 कोटी रुपयांना विकत घेतली होती. अयोध्येतील ही त्यांची तिसरी मोठी गुंतवणूक आहे.
advertisement
केवळ अयोध्येतच नाही तर बिग बी यांनी महाराष्ट्रातील अलिबागमध्येही जमीन खरेदी केली आहे. बिग बींनी HoABL च्याच मार्फत अलिबागमध्ये, 10 कोटी रुपये खर्चून 10,000 स्क्वेअर फुटांचा भूखंड खरेदी केला होता. तिथं इतरही बी टाऊन सेलिब्रिटींनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी "सोल दे अलिबाग" नावाच्या प्रकल्पात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे.








