Mumbai Local: मुंबईकर वीकेंडचा प्लॅन बदला! मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर खोळंबा, ‘या’ लोकल रद्द
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच रविवारी बाहेर पडायचा प्लॅन करावा लागेल. तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मुंबईकरांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडायचा प्लॅन करावा लागेल.
मेगाब्लॉक कधी?
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.45 या वेळेत ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत ब्लॉक आहे. या ब्लॉक काळात मुख्य मार्गावरील सर्व जलद लोकलच्या फेऱ्या धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात येतील.
advertisement
हार्बर मार्गावरील ब्लॉक
हार्बर मार्गावरील सीएसएमटी-पनवेल / बेलापूर / वाशी दरम्यान सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान लोकल सेवा रद्द राहतील. या काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान ठाणे-वाशी/ नेरुळमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
advertisement
पत्री पुलासाठी विशेष ब्लॉक
कल्याण ते ठाकुर्लीदरम्यान मध्य रेल्वेकडून 6 ते 9 मार्च दरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. याठिकाणी तिसऱ्या पत्री पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्याचे गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल केला असून काही लोकल फेऱ्या देखील अंशतः रद्द राहतील.
advertisement
कल्याण ते डोंबिवलीत ब्लॉक
कल्याण-डोंबिवलीत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर 7 आणि 8 मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येईल. मध्यरात्री 1:45 ते पहाटे 4:15 दरम्यान हा ब्लॉक असेल. ब्लॉक काळात कल्याण ते डोंबिवलीदरम्यान अप-डाऊन जलद व धीम्या लोकल फेऱ्या रद्द राहतील. सीएसएमटीहून कर्जतसाठी मध्यरात्रीनंतर 12.08 वाजता सुटणारी लोकल ठाण्यापर्यंतच धावेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 7:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकर वीकेंडचा प्लॅन बदला! मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर खोळंबा, ‘या’ लोकल रद्द








