advertisement

IND Vs NZ फायलन पाहायची? पश्चिम रेल्वेकडून स्पेशल गिफ्ट, अहमदाबादसाठी धावणार विशेष रेल्वे

Last Updated:

IND vs NZ T20 World Cup Final Special Train: भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. क्रिडाप्रेमींना हा सामना पाहण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वेची सोय केली आहे.

IND vs NZ T20 World Cup Final Special Train
IND vs NZ T20 World Cup Final Special Train
मुंबई: क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या वेळेची संपूर्ण भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आता जवळ येत आहे. सध्या टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) सुरू आहे. टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीमध्ये काल टीम इंडियाने इंग्लंडवर सात धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. क्रिडाप्रेमींना हा सामना पाहण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांची सोय करून दिली आहे.
जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्टेडियममध्ये तब्बल दहा लाख प्रेक्षक एकाचवेळी लाईव्ह सामना पाहू शकणार आहेत. भारतात होणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. ट्रेन क्रमांक 09027 मुंबई सेंट्रल- अहमदाबाद अतिजलद तेजस एक्स्प्रेस 7 मार्च रोजी मुंबई सेंट्रलवरून रात्री 11.45 वाजता सुटेल जी अहमदाबाद स्थानकावर 8 मार्चला सकाळी 8.30 वाजता पोहचेल. तर हीच ट्रेन मुंबईला परतण्यासाठीही असणार आहे. ट्रेन क्रमांक 09028 अहमदाबाद- मुंबई सेंट्रल अतिजलद तेजस एक्स्प्रेस 9 मार्च रोजी मध्यरात्री 3 वाजता अहमदाबादवरून सुटेल आणि मुंबई सेंट्रलला सकाळी 11.15 वाजता पोहचेल. ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा या स्थानकांवर थांबणार असून या रेल्वेगाडीला प्रथम वातानुकूलित, द्वितीय वातानुकूलित आणि तृतीय वातानुकूलित अशी रचना करण्यात आली आहे.
advertisement
दुसरी स्पेशल ट्रेन क्रमांक 09021 मुंबई सेंट्रल- अहमदाबाद वातानुकूलित अतिजलद एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून 8 मार्च रोजी सकाळी 06.20 वाजता सुटेल. ही ट्रेन दुपारी 12.40 वाजता अहमदाबादला पोहचेल. तर हीच परतीच्या प्रवासासाठीही असेल. गाडी क्रमांक 09022 अहमदाबाद- मुंबई सेंट्रल वातानुकूलित अतिजलद एक्स्प्रेस अहमदाबादवरून 8 मार्च रोजी दुपारी 03.10 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला रात्री 09.45 वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला विस्टाडोम, एक्झिक्युटिव्ह अनुभुती डबा, एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि चेअर कार डबे असतील. या रेल्वेगाडीला बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा येथे थांबा देण्यात येईल. 09027 आणि 09028 या ट्रेनसाठी बुकिंग 6 मार्च 2026 पासून सुरू झाले आहे. 09021 आणि 09022 या ट्रेनसाठी बुकिंग 7 मार्च 2026 पासून सुरू होईल. प्रवासी सर्व पीआरएस काउंटरवर किंवा आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे त्यांचे तिकिटे बुक करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
IND Vs NZ फायलन पाहायची? पश्चिम रेल्वेकडून स्पेशल गिफ्ट, अहमदाबादसाठी धावणार विशेष रेल्वे
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement