advertisement

OTT Best Thriller Series: कडाक्याची थंडी, गटारात सापडला मृतदेह, प्रत्येक सीनमध्ये भरभरून सस्पेन्स! क्लायमॅक्स पाहून डोकं धराल

Last Updated:
K Drama thriller series: जर तुम्हाला वाटत असेल की कोरियन ड्रामा म्हणजे फक्त रोमान्स आणि गोड गाणी, तर तुमचा हा समज पूर्णपणे मोडीत निघेल.
1/9
 "सत्य हे सूर्याच्या प्रकाशासारखं असतं, ज्याने डोळे दिपतात. पण खोटं एका सुंदर स्वप्नासारखं असतं, जिथे सगळं काही चमचमत्या प्रकाशात दडलेलं असतं... जोपर्यंत ते पकडलं जात नाही!" हीच ओळ सध्या नेटफ्लिक्सवर राज्य करणाऱ्या एका कोरियन थ्रिलर वेब सीरिजचा आत्मा आहे.

2/9
जर तुम्हाला वाटत असेल की कोरियन ड्रामा म्हणजे फक्त रोमान्स आणि गोड गाणी, तर तुमचा हा समज 'द आर्ट ऑफ सारा' (The Art of Sarah) पाहून पूर्णपणे मोडीत निघेल. गेल्या महिनाभरापासून टॉप १० मध्ये असलेल्या या सीरिजने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय.

3/9
कथेची सुरुवात होते एका भयावह दृश्याने. शहराच्या गजबजलेल्या भागात एका गटरमध्ये एक छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडतो. चेहरा इतका विद्रूप झालाय की ओळख पटवणं अशक्य आहे. पण पायावर असलेल्या एका विशिष्ट टॅटूमुळे गूढ उकलतं. हा मृतदेह आहे सारा किमचा. पण इथूनच खरा थरार सुरू होतो.

4/9
सारा किम नक्की कोण होती? तिला गटरमध्ये थंडीत मरायला कोणी सोडलं? जसे आठ भाग पुढे सरकतात, तशी एक एक गूढ उलगडत जाते. ही हाय-प्रोफाईल केस, फसवणूक आणि सूडाचा असा खेळ आहे जिथे प्रत्येक पात्र संशयाच्या भोऱ्यात आहे.

5/9
डिटेक्टिव्ह पार्क मू-ग्योन्ग जेव्हा या प्रकरणाचा तपास करतो, तेव्हा त्याला कळतं की आपण ज्याला शेवट समजतोय, ती तर फक्त सुरुवात आहे.

6/9
या सीरिजचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे याचा शेवट. ७.३ IMDb रेटिंग मिळालेल्या या सीरिजचा शेवट एका अशा वळणावर होतो की, प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

7/9
शेवटच्या भागात सारा किम म्हणते,
शेवटच्या भागात सारा किम म्हणते, "मी सारा नाहीये, मी जिला मारलं ती सारा आहे." पण सत्य यापेक्षाही भयानक आहे, ज्याचं उत्तर शोधण्यासाठी डिटेक्टिव्ह थेट जेलमध्ये तिला भेटायला जातो.
advertisement
8/9
शिन हये-सनने सारा किमच्या भूमिकेत जो अभिनय केलाय, तो अंगावर काटा आणणारा आहे. तिचे बदलणारे हावभाव पाहून ती नक्की गुन्हेगार आहे की पीडित, हे ओळखणं कठीण होतं. ली जुन-ह्यूकने डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आपल्या शांत पण तितक्याच तीक्ष्ण नजरेने सीरिजमध्ये जान भरली आहे.

9/9
याव्यतिरिक्त किम जे-वोन आणि जंग डा-बिन यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कोणतीही कॉमेडी नाही, उगाचचा ओढलेला रोमान्स नाही, फक्त अस्सल सस्पेंस आणि मिस्ट्री!

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement