advertisement

पुणेकरांसाठी खुशखबर! नवा मेट्रो मार्ग लवकरच सेवेत दाखल होणार, अखेर डेडलाईन ठरली 

Last Updated:

येत्या काही वर्षांत पुण्यात नवा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे, ज्यामुळे रोजच्या ट्रॅफिकमधून पुणेकरांची सुटका होणार आहे. सध्या कोंढवा ते येवलेवाडी 20 किमी लांब मार्गिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

नवा मेट्रो मार्ग लवकरच सेवेत दाखल होणार ,अखेर डेडलाईन ठरली 
नवा मेट्रो मार्ग लवकरच सेवेत दाखल होणार ,अखेर डेडलाईन ठरली 
पुणे: येत्या काही वर्षांत पुण्यात नवा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे, ज्यामुळे रोजच्या ट्रॅफिकमधून पुणेकरांची सुटका होणार आहे. सध्या कोंढवा ते येवलेवाडी 20 किमी लांब मार्गिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या मेट्रोचा प्रवास विशेषत: दक्षिण पुणेकरांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. प्रस्तावित मार्गावर सुमारे प्रत्येक 1 किमी अंतरावर मेट्रो स्टेशन असणार आहेत. शिवाजीनगरपासून येवलेवाडीपर्यंत हा मार्ग राबवला जाणार असून, कोंढवा ते येवलेनगर मेट्रो महामेट्रोच्या माध्यमातून उभारली जाणार आहे. याशिवाय, एनबीएम ते उंड्री मार्गावर अतिरिक्त विस्तार आणि कॅम्प-पुलगेटमार्गे मेट्रो जोडण्याचे प्रस्तावही आहेत.
दक्षिण पुणेकरांसाठी मेट्रोची सोय
कोंढवा ते येवलेवाडी परिसरातील रहिवाशांना लवकरच मेट्रो सेवा मिळणार आहे. शिवाजीनगरपासून येवलेवाडीपर्यंत 20 किमी लांब मार्गिका सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, जी 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या मार्गावर मेट्रो उभारण्याचे काम हाती घेतल्याची माहिती दिली आहे.
advertisement
हिंजवडी ते शिवाजीनगर 23 किमी लांब मेट्रो विस्ताराचा भाग असून, ही सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारली जाणार आहे. कोंढवा ते येवलेनगर मेट्रो महामेट्रोच्या माध्यमातून राबवली जाईल. याशिवाय, एनबीएम ते उंड्री मार्गावर अतिरिक्त विस्तार आणि कॅम्प-पुलगेट मार्गे मेट्रो जोडण्याचे प्रस्तावही तयार आहेत.
महामेट्रोने प्रस्तावित मार्ग शिवाजीनगरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोडण्यात येणार आहे. पुढे हा मार्ग कॅम्प आणि पुलगेटमार्गे कोंढवा आणि येवलेवाडीपर्यंत वाढवला जाणार आहे. ज्योती चौक ते एनआयबीएम जंक्शन आणि पुढे उंड्रीपर्यंत मेट्रो नेण्यात येणार असल्याचं मानस आहे. साधारण 1 किमी अंतरावर मेट्रो स्टेशन असणार आहेत. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. 2030-31 पर्यंत ही मेट्रो सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर दक्षिण पुणेकरांना कमी वेळात, सुसाट आणि गारेगार प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी खुशखबर! नवा मेट्रो मार्ग लवकरच सेवेत दाखल होणार, अखेर डेडलाईन ठरली 
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement