Chandra Grahan 2026: धूलिवंदनच्या संध्याकाळी लागणारं चंद्रग्रहण 3 राशींना त्रासाचे; सूतक काळ लागताच परिणाम दिसेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chandra Grahan 2026: मंगळवारी धूलिवंदन दिवशी 3 मार्च 2026 ला भारतात चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असेल. भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी संपेल. महाराष्ट्रात चंद्रोदयानंतर फार कमी काळच ते आपल्याला पाहता येईल.
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशांच्या बाबतीत अडचणींचा ठरू शकतो. अडकलेले पैसे मिळायला उशीर होईल. नोकरी असो वा व्यवसाय, दोन्हीकडे परिस्थिती थोडी अस्थिर राहू शकते. सोबत काम करणाऱ्यांशी वाद वाढण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रू तुमच्या विरोधात काहीतरी हालचाली करून नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मानसिक दडपण वाढल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं तर पोटाचे विकार किंवा ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वेळीच सावध राहा.
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अडचणींचा आणि गोंधळाचा असू शकतो. कामात सारखा उशीर होईल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ लगेच मिळणार नाही. खर्च वाढल्यामुळे आर्थिक ओढाताण जाणवेल. कुटुंबात थोडा तणाव असू शकतो आणि आपल्याच माणसांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात सतत बेचैनी राहील आणि रात्री झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो. प्रवास करताना विशेष काळजी घ्या आणि कुणावरही लगेच डोळे झाकून विश्वास ठेवू नका.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





