खूप कंट्रोल केलं पण, कंठ दाटला आणि अश्रूंचा बांध फुटला! खामेनेईंच्या मृत्यूची बातमी देतानाच अँकरला कोसळलं रडू
- Published by:Priya Lad
Last Updated:
Khamenei Death TV Anchor Cried : ती बातमी देते की, 'इमाम खामेनेई शहीद झाले आहेत' आणि तोच तिचा आवाज जड होतो आणि डोळ्यांतून पाणी वाहू लागतं.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. इराणचं सरकारी टेलिव्हिजन चॅनेल प्रेस टीव्हीने याची पुष्टी केली आहे. या चॅनेलची अँकर खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी देत होती. तेव्हा तिचाही कंठ दाटून आला आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. तिने स्वत:ला कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला पण भावनांना ती रोखू शकली नाही. बातमी देता देताच तिला रडू कोसळलं. बातमी सांगतानाच ती रडू लागली.
खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी देताना रडणाऱ्या या अँकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मरियम अझरचेहर असं या अँकरचं नाव आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ती हल्ल्याच्याच बातम्या देत येते. इतक्यात तिला खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. ते ऐकूनच तिला धक्का बसतो. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव लगेच बदलतात. तिला ही बातमी द्यायची असते, त्यामुळे ती खूप कंट्रोल करते, पण काही केल्या ती आपले इमोशन्स रोखू शकली नाही. 'इमाम खामेनेई शहीद झाले आहेत', बातमी देताना हे वाक्य ती म्हणते तेव्हाच तिचा आवाज जड होतो आणि डोळ्यांतून पाणी वाहू लागतं.
advertisement
प्रेस टीव्हीनुसार सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर इराणी सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. देशभरात सात दिवसांची अधिकृत सुट्टी देखील जाहीर केली आहे. प्रमुख इराणी शहरांमधील सरकारी इमारतींवर ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले आहेत आणि धार्मिक स्थळांवर शोकसभा आयोजित केल्या जात आहेत.
advertisement
🚨🚨
التلفزيون الإيراني الرسمي يعلن مقتل المرشد علي خامنئي. pic.twitter.com/qXK7WxIHDr
— عاجل السعودية (@3ajel_ksa) March 1, 2026
खामेनेईंना कसं मारलं?
अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी 28 फेब्रुवारील इराणवर मोठा हल्ला केला. या मोहिमेला इस्रायलने 'रोअरिंग लायन' (Roaring Lion) आणि अमेरिकेने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) असं नाव दिलं होतं. हा हल्ला थेट तेहरानमधील खामेनेई यांच्या निवासस्थानासह एकूण 30 ठिकाणी करण्यात आला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी खामेनेई हे त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसोबत हेड क्वार्टरमध्ये बैठक घेत होते.
advertisement
डझनभर इस्रायली फायटर जेट्सनी इराणमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बफेक केली. यामध्ये खामेनेई यांच्या घरासोबतच इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्यात आलं. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली लढाऊ विमानांनी खामेनेई यांच्या घरावर एकाच वेळी तब्बल 30 बॉम्ब टाकले.
advertisement
खामेनेई यांचं निवासस्थान अत्यंत सुरक्षित आणि मजबूत मानलं जात होतं. मात्र हा हल्ला इतका भीषण होता की खामेनेई यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला, असं वृत्त काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिलं आहे. प्राथमिक रिपोर्टनुसार इस्रायलने त्यांच्या अत्यंत प्रगत अशा बंकर-बस्टर (Bunker-buster) बॉम्बचा वापर केला असावा, असा अंदाज आहे.
खामेनेई यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. यात त्यांची मुलगी, जावई, नातू आणि सून यांचा समावेश आहे.
Location :
Delhi
First Published :
Mar 01, 2026 9:56 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
खूप कंट्रोल केलं पण, कंठ दाटला आणि अश्रूंचा बांध फुटला! खामेनेईंच्या मृत्यूची बातमी देतानाच अँकरला कोसळलं रडू







