'PM सर, आम्हाला इथून काढा', बॉलिवूडची अभिनेत्री अडकली दुबईत, विमानतळावरची सांगितली भयानक परिस्थिती!
- Published by:Sachin S
Last Updated:
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची दुबईला झळ पोहोचली आहे. दुबईमधून येणार जाणारे विमानं रद्द झाली आहे
अमेरिका आणि इस्त्रायलने एकत्र येते इराणवर संयुक्त हल्ला केला आहे. तर इराण सुद्धा जशास तसे उत्तर दिले आहे. तिन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे आशिया खंडात युद्धाचे काळे ढग निर्माण झाले आहे. अरब राष्ट्रांमध्ये यामुळे तणावाची परिस्थितीत आहे. दुबईजवळ असलेल्या अमेरिकेनं सैन्याच्या तळावर हल्ले झाले आहे. त्यामुळे दुबई अनेक जण अडकले आहे. याच गर्दीमध्ये जन्नत फेम अभिनेत्री सोनल चौहान ही दुबईमध्ये अडकली आहे. तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची दुबईला झळ पोहोचली आहे. दुबईमधून येणार जाणारे विमानं रद्द झाली आहे. लाखो प्रवासी दुबईमध्ये अडकली आहे. दुबईमध्ये शुटिंगसाठी गेलेली अभिनेत्री सोनम चौहान दुबई विमानतळावर अडकली आहे. तिने ट्वीट करून भारत सरकारकडे मदत मागितली आहे.
Hon’ble PM @narendramodi ji,
I am currently stranded in Dubai due to the ongoing crisis, with flights cancelled and no clear way to return to India. I respectfully seek the Government’s guidance for a safe journey home
Grateful for any support extended🙏🏻🇮🇳@MEAIndia @IndiainDubai
— SONAL CHAUHAN (@sonalchauhan7) February 28, 2026
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टॅग करून सोनमने आपण दुबईमध्ये अडकलो आहोत. इथं तणावपूर्ण परिस्थिती आहे, कोणतीही विमानं नाही. जी विमान उड्डाण करणार होती ती रद्द करण्यात झाली आहे. त्यामुळे भारतात परत येण्याचे मार्ग बंद झाले आहे. त्याामुळे भारत सरकाराने आम्हाला इथून बाहेर काढावं, अशी विनंती सोनम चौहानने केली आहे.
advertisement
कोण आहे सोनम चौहान?
सोन चौहान हिने २००८ मध्ये जन्नत या ब्लॉकबॉस्ट सिनेमातून अभिनेता इमरान हाश्मीसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तिचा हा पहिलाच चित्रपट होता. यााआधी तिने मॉडेल म्हणून २००५ मध्ये मलेशियात 'मिस वर्ल्ड टुरिझम' चा पुरस्कार जिंकला होता. अलीकडेच तिने प्रभास सोबत आदिपुरुष सिनेमात काम केलं आहे. येणाऱ्या मिर्झापूर द फिल्ममध्ये तिची खास भूमिका असणार आहे, अशी चर्चा आहे. तिने बॉलिवूडच नाहीतर दाक्षिणात्य सिनेमामध्येही काम केलंआहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 11:44 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'PM सर, आम्हाला इथून काढा', बॉलिवूडची अभिनेत्री अडकली दुबईत, विमानतळावरची सांगितली भयानक परिस्थिती!








