लोणावळ्याच्या घाटात मालगाडीचे 'ब्रेक फेल'; सुसाट वेग अन् काळजाचा थरकाप, शेवटी काय घडलं? Video
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
तीन इंजिन असलेली 'केएलएमजी' (KLMG) मालवाहू गाडी खंडाळा घाटातून उतरत असताना पळसदरी जवळ तिच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. उतारावर वेग मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने गाडी अनियंत्रित झाली.
पुणे : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील खंडाळा घाटात गुरुवारी दुपारी एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका मालगाडीचे लोणावळा ते कर्जत दरम्यान पळसदरी घाटात अचानक 'ब्रेक फेल' झाले. उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही मालगाडी प्रचंड वेगाने धावू लागली, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
नेमकी घटना काय?
तीन इंजिन असलेली 'केएलएमजी' (KLMG) मालवाहू गाडी खंडाळा घाटातून उतरत असताना पळसदरी जवळ तिच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. उतारावर वेग मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने गाडी अनियंत्रित झाली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, ती कोणत्याही क्षणी रुळावरून घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात गाडीचा थरकाप उडवणारा वेग स्पष्टपणे दिसत आहे.
advertisement
— Naresh Shende (@NareshShen87640) February 27, 2026
असा टळला मोठा अनर्थ
घटनेचे गांभीर्य ओळखून डब्ल्यूएजी-१२ (WAG-12) इंजिनचे लोको पायलट, ट्रेन मॅनेजर आणि रेल्वेच्या तांत्रिक चमूने कमालीचे प्रसंगावधान दाखवले. मालगाडीचा वेग रोखण्यासाठी कर्जत दरम्यानचा ओव्हर हेड वायरचा (OHE) विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. अखेर अथक प्रयत्नांनंतर ही अनियंत्रित मालगाडी कर्जतच्या पुढे सुरक्षितपणे थांबवण्यात यश आलं. सुदैवाने, या घटनेत लोको पायलट आणि सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
advertisement
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
मध्य रेल्वेने या 'मोठ्या सुरक्षा त्रुटी'ची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. घाटात बँकर लोकोच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड कसा झाला? आणि नेमकी तांत्रिक चूक कुठे झाली? याचा तपास रेल्वे यंत्रणांकडून सुरू आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा रेल्वे अपघात टळला, अशी भावना व्यक्त होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 9:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
लोणावळ्याच्या घाटात मालगाडीचे 'ब्रेक फेल'; सुसाट वेग अन् काळजाचा थरकाप, शेवटी काय घडलं? Video







