advertisement

Team India : 6,6,6,6,4,4,4... कॅप्टनने दोनदा अपमान केला, टीम इंडियाच्या स्टारने व्याजासकट हिशोब चुकता केला!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 72 रननी दणदणीत विजय मिळवला आहे. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंगला आलेल्या भारताने 20 ओव्हरमध्ये 256/4 एवढा मोठा स्कोअर केला.

6,6,6,6,4,4,4... कॅप्टनने दोनदा अपमान केला, टीम इंडियाच्या स्टारने व्याजासकट हिशोब चुकता केला!
6,6,6,6,4,4,4... कॅप्टनने दोनदा अपमान केला, टीम इंडियाच्या स्टारने व्याजासकट हिशोब चुकता केला!
चेन्नई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 72 रननी दणदणीत विजय मिळवला आहे. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंगला आलेल्या भारताने 20 ओव्हरमध्ये 256/4 एवढा मोठा स्कोअर केला. टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा स्कोअर आहे. तसंच या टी-20 वर्ल्ड कपमधला कोणत्याही टीमचा हा सर्वोत्तम स्कोअर होता. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकांमुळे भारताने एवढ्या मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारली.
अभिषेक शर्माने 30 बॉलमध्ये 55 आणि हार्दिक पांड्याने 23 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. अभिषेकने 4 फोर आणि 4 सिक्स तर हार्दिकने 4 सिक्स आणि 2 फोर मारले. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने 13 बॉलमध्ये 33, इशान किशनने 24 बॉल 38, संजू सॅमसनने 15 बॉल 24 आणि तिलक वर्माने 16 बॉलमध्ये नाबाद 44 रनची खेळी केली.
advertisement

तिलक वर्मा टार्गेटवर

या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाचा धक्का बसला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची बॅटिंग गडगडली. त्यातच तिलक वर्माने खेळलेल्या बेजबाबदार शॉटमुळे त्याच्यावर चौफेर टीका झाली. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकरही तिलक वर्माच्या या शॉटवर संतापले. तसंच टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही मॅचनंतर तिलक वर्माबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. पॉवर प्लेमध्ये तुम्ही मॅच जिंकू शकत नाही, पण पॉवर प्लेमध्ये तुम्ही मॅच नक्कीच हरू शकता, विचार करून खेळलं पाहिजे, असं परखड मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केलं.
advertisement
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर झिम्बाब्वेविरुद्ध तिलक वर्माचं डिमोशन केलं. गेलं तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या तिलकला थेट सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं गेलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली चूक आणि कॅप्टनचा ओढावलेला रोष या सगळ्याला तिलकने त्याच्या बॅटने प्रत्युत्तर दिलं. तिलकने 16 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नाबाद 44 रन केले. तिलकने तब्बल 275 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.
advertisement

मुंबईत असताना रिटायर आऊट

याआधी आयपीएल 2025 च्या मोसमातही एका सामन्यात तिलक वर्मा संघर्ष करत होता, तेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि कोच महेला जयवर्धने यांनी तिलकला रिटायर आऊट करून पॅव्हेलियनमध्ये बोलावलं. आयपीएलमध्ये रिटायर आऊट झाल्यानंतरही तिलकने बॅटनेच उत्तर दिलं होतं. एकदा रिटायर आऊट झाल्यानंतर तिलकने सातत्याने धमाकेदार कामगिरी केली, त्यामुळे मुंबईने थेट प्ले-ऑफमध्ये धडक दिली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 6,6,6,6,4,4,4... कॅप्टनने दोनदा अपमान केला, टीम इंडियाच्या स्टारने व्याजासकट हिशोब चुकता केला!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement