झिम्बाबेच्या 22 वर्षाच्या पोरानं टीम इंडियाला घाम फोडला, बुमराहला बॉलवर सिक्स ठोकला, वादळी खेळी करणारा खेळाडू कोण?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी झिम्बाबेच्या एका 22 वर्षीय खेळाडूने टीम इंडियाला धु धु धूतला आहे. विशेष म्हणजे त्या खेळाडूने बुमराहसारख्या बॉलरला सिक्स मारून वादळी केली खेळी केली आहे.
India vs Zimbabwe : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने आज झिम्बाबेचा 72 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाबे 184 धावाच करू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला होता. भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी झिम्बाबेच्या एका 22 वर्षीय खेळाडूने टीम इंडियाला धु धु धूतला आहे. विशेष म्हणजे त्या खेळाडूने बुमराहसारख्या बॉलरला सिक्स मारून वादळी केली खेळी केली आहे. या खेळीची आता प्रचंड चर्चा रंगली आहे.
भारताने दिलेल्या 256 धावांचा पाठलाग करताना झिम्बाबेची सूरूवात चांगली झाली होती कारण त्यांनी 44 धावांवर आपली पहिली विकेट गमावली होती. यावेळी मारूमनी 20 धावा करून बाद झाला होता.त्याच्यानंतर डिऑन मायर्स आला पण तो 6 धावांवर स्वस्तात बाद झाला.त्याच्यानंतक कॅप्टन सिंकदरने 31 धावा करून चांगला प्रतिकार केला, पण नंतर तो देखील बाद झाला.
advertisement
सिकंदर बाद झाल्यानंतर झिम्बाबेचा डाव गडगडत होता.त्यावेळी झिम्बाबेचा 22 वर्षीय ब्रायन बॅनेट टीम इंडियाला एकटा भिडत होता. विशेष म्हणजे तो एकटा भिडला नाही तर त्याने टीम इंडियाला अक्षरस घाम फोडला होता. ब्रायन बेनेटने बुमराह पासून वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि अर्शदिप सिंह या सर्वट गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली होती.
बुमराच्या तर ओव्हरमध्ये त्याने सिक्स ठोकून आपले अर्धशतक ठोकलं होतं. यावेळी त्याने 34 बॉलमध्ये त्याने हे अर्धशतक ठोकलं होतं.त्यानंतर त्याने शेवटपर्यंत टीम इंडियाच्या बॉलरची धुलाई करत त्याना विकेटसाठी तरसायला लावलं होत. पण शेवटपर्यत तो आऊटचा झाला नाही. तो या सामन्यात शेवटच्या बॉलपर्यंत खेळला आणि त्याने 59 बॉल 97 धावांची नाबाद खेळी केली. जर आणखीण एक बॉल शिल्लक असता तर त्यांची सेच्यूरी होती.या सामन्यात त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले होते. या त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला घाम फुटला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 11:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
झिम्बाबेच्या 22 वर्षाच्या पोरानं टीम इंडियाला घाम फोडला, बुमराहला बॉलवर सिक्स ठोकला, वादळी खेळी करणारा खेळाडू कोण?







