advertisement

Pune Crime: भोसरीत भरदिवसा 'फिल्मी' थरार! धाडसी नागरिकांनी चोरट्यांना पकडलं, पण त्यांनी पिस्तूल काढला अन्...धक्कादायक घटना

Last Updated:

भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात मंगळवारी सकाळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन सराईत चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला.

चोरट्यांचं धक्कादायक कांड (AI Image)
चोरट्यांचं धक्कादायक कांड (AI Image)
पिंपरी-चिंचवड : भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात मंगळवारी सकाळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन सराईत चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला. एका चोरट्याने पिस्तुलाचा धाक दाखवून पळ काढला, तर दुसऱ्याला धाडसी नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या झटापटीत दोन नागरिक जखमी झाले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
इंद्रायणीनगरमधील चैतन्य पार्क, साईदर्शन सोसायटीत राहणारे धर्मेंद्र झा यांच्या घरात सकाळी ८ च्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. दरवाजाचे लॅच तोडून त्यांनी घरातील ५५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि चांदीची नाणी चोरली. चोरी करून पळून जात असताना सोसायटीतील सतर्क नागरिकांना त्यांचा संशय आला आणि त्यांनी चोरट्यांना अडवले.
advertisement
नागरिकांशी झटापट आणि शस्त्रे उपसली
पकडल्या जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी शस्त्रांचा वापर केला. सागरसिंग ऊर्फ फंट्यास्टिक बावरी याने नागरिकांवर चाकूने हल्ला केला, ज्यात सचिन पिंगळे आणि ध्वजशेर शाही हे जखमी झाले. याचवेळी त्याच्या साथीदाराने चक्क पिस्तूल उपसले आणि गोळीबाराची भीती दाखवत दुचाकीवरून धूम ठोकली. मात्र, नागरिकांनी जिवाची पर्वा न करता सागरसिंगला पकडून ठेवले आणि चांगलाच चोप दिला.
advertisement
सराईत गुन्हेगार जाळ्यात
पकडलेला सागरसिंग हा मूळचा जालन्याचा असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जालना आणि नागपूरमध्ये घरफोडीचे १७ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवजी, चाकू, काडतूस आणि पिस्तूलचे मॅग्झिन जप्त केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी चोरीसाठी वापरलेली दुचाकीही विश्रांतवाडी परिसरातून चोरलेली होती.
भोसरी पोलीस आता फरार झालेल्या पिस्तूलधारी चोरट्याचा शोध घेत असून, नागरिकांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: भोसरीत भरदिवसा 'फिल्मी' थरार! धाडसी नागरिकांनी चोरट्यांना पकडलं, पण त्यांनी पिस्तूल काढला अन्...धक्कादायक घटना
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement