Pune: 'तो' दबक्या पावलाने आला, चाहूल लागली अन् एक पळाला आणि दुसऱ्याची मानचं पकडली, पुण्यातला थरारक VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडीचे माजी सरपंच भरत फल्ले यांच्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना घडली
पुणे: पुणे आणि नाशिक भागामध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मध्यतंरी लोकवस्तीत येऊन बिबट्याने लहान मुलांवर हल्ले करून ठार मारल्याच्या अनेक संतप्तजणक घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा पुण्यातील मंचरमध्ये बिबट्याचा वावर वाढला, असल्याचं समोर आलं आहे. अशातच मंचरमध्ये बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील मेंगडेवाडी इथं २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.२२ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
[video width="1264" height="720" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-25-at-16.58.06-2026-02-51fff411e76cf3fde5db1e83e0a59036.mp4"][/video]
आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडीचे माजी सरपंच भरत फल्ले यांच्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. माजी सरपंच भरत फल्ले घराबाहेर त्यांचे पाळीव श्वान झोपलेले होते. अचानक बिबट्या दबक्या पावलाने आला, बिबट्या येण्याची चाहूल एकाला लागताच त्याने पळ काढला.
advertisement
पण, समोरच झोपलेल्या दुसऱ्या कुत्र्याला काही कळायच्या आत बिबट्याने झडप घातली आणि कुत्र्याची मान पकडली. बिबट्या या हल्ल्यात कुत्र्याला बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. पण, वेळीच पहिल्या कुत्र्याने पळ काढला. तर माजी सरपंच भरत फल्ले यांच्या बंगल्यात बांधून असलेल्या तिसऱ्या पाळीव कुत्र्याने मात्र सगळ्या प्रकारावर दूरूनच भुंकत होता. कुत्र्याचे शिकारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून वनखात्याने पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 7:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: 'तो' दबक्या पावलाने आला, चाहूल लागली अन् एक पळाला आणि दुसऱ्याची मानचं पकडली, पुण्यातला थरारक VIDEO









