advertisement

 होत्याचं नव्हतं झालं! खंडाळा फाट्याला Swift अन् ट्रकची भीषण धडक; श्रीरामपूरच्या 5 जणांचा जागेवर मृत्यू

Last Updated:
धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
1/9
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर–संगमनेर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.  श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या जबर धडकेत श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

2/9
या अपघातात दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश असून  दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  श्रीरामपूर येथील एक कुटुंब कारने संगमनेरच्या दिशेने जात असताना खंडाळा गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकशी कारची जोरदार धडक झाली.

3/9
 धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
advertisement
4/9
कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला  तर दोन जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले.

5/9
अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस आणि आपत्कालीन सेवांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या खासगी आणि शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

6/9
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, भरधाव वेग आणि चुकीचा अंदाज यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

7/9
या अपघातामुळे काही काळ श्रीरामपूर–संगमनेर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या.

8/9
 दरम्यान, या मार्गावर वारंवार होणारे अपघात आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावरील खड्डे, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि वेगमर्यादेचे पालन न होणे यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप केला जात आहे.

9/9
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण श्रीरामपूर शहर शोकसागरात बुडाले आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement