advertisement

Pune Crime: मध्यरात्री दोनची वेळ, दगड घालून तोडला घराचा दरवाजा; कोयता काढला अन्... पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

Last Updated:

मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजावर मोठा दगड फेकून दरवाजा तोडला. मोठा आवाज झाल्याने कोरडे कुटुंबीय जागे झाले, मात्र समोर चोरटे पाहून त्यांची बोबडी वळाली.

मध्यरात्री मोठा दरोडा (AI Image)
मध्यरात्री मोठा दरोडा (AI Image)
पुणे : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील कोरडे मळ्यात शनिवारी (२१ फेब्रुवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास एका कुटुंबासोबत भयंकर घडलं. अज्ञात चोरट्यांनी बंदुकीच्या नव्हे, तर कोयत्याच्या धाकावर घरातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दगड मारून दरवाजा तोडला अन् घरात शिरले
राजेंद्र सीताराम कोरडे हे आपल्या कुटुंबासह शेतातील घरात वास्तव्यास आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजावर मोठा दगड फेकून दरवाजा तोडला. मोठा आवाज झाल्याने कोरडे कुटुंबीय जागे झाले, मात्र समोर चोरटे पाहून त्यांची बोबडी वळाली. चोरट्यांनी राजेंद्र कोरडे यांच्यावर काठीने प्रहार केला आणि सर्वांच्या मानेवर कोयता धरून आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
advertisement
कुटुंबाला डांबून दागिने लंपास
चोरट्यांनी संपूर्ण कुटुंबाला धमकावत एका खोलीत बंद केलं. त्यानंतर घराचा ताबा घेत कपाटाचं लॉकर तोडून सुमारे १५ तोळे सोन्याचे आणि १० तोळे चांदीचे दागिने लंपास केले. "पैसे आणि दागिने कुठे आहेत ते लवकर सांगा, नाहीतर कापून टाकू," अशी धमकी देत त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
advertisement
शेतातील घरांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: मध्यरात्री दोनची वेळ, दगड घालून तोडला घराचा दरवाजा; कोयता काढला अन्... पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement