advertisement

Weather Alert: महाराष्ट्रात अचानक हवापालट, थंडी, ऊन नव्हे, आता थेट 11 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्राच्या हवामानात अचानक मोठे बदल जाणवत असून अवकाळी संकट घोंघावत आहे. 24 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
1/5
फेब्रुवारी महिना संपत आला असून राज्यात उन्हाळ्याची चाहूल अधिक स्पष्टपणे जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशातच गेल्या 2 दिवसांत हवामानात अचानक बदल जाणवत आहेत. राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रावर ढगाळ हवामानासह अवकाळी संकट घोंघावत आहे. आज राज्यातील 11 जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. 24 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण आणि दमट हवामान राहील. सकाळी वातावरण सौम्य असले तरी दुपारी उन्हाचा तडाखा वाढेल. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आकाश बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.

3/5
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात हवापालट झाली आहे. सोमवारपासून अचानक हवा बदलली असून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज देखील पुणे, सोलापूरसह काही भागात पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहील.

4/5
मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अशातच मंगळवारी हवामानात मोठे बदल जाणवतील. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव भागात पावसाची शक्यता आहे. तर विदर्भतील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपुरात आज गडगडाटी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात कमाल तापमान 37 ते 39 अंश तर किमान 19 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

5/5
दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येणाऱ्या आद्रतेमुळे पावसाचे ढग तयार झाले आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. अचानक ढगाळ हवामानासह पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजानुसार योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement