advertisement

गैरप्रकारांना बसणार आळा, रेशन व्यवस्थेत मोठा बदल, कागदी रेशनकार्ड आता होणार इतिहासजमा

Last Updated:

यासाठी लवकरच स्मार्ट रेशन कार्ड योजना राबवण्यात येणार आहे. फेब्रुवारीनंतर स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू होणार असून बोगस प्रकारांना आळा बसेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

रेशन व्यवस्थेत मोठा बदल; कागदी रेशनकार्ड होणार इतिहासजमा
रेशन व्यवस्थेत मोठा बदल; कागदी रेशनकार्ड होणार इतिहासजमा
पुणे : रेशनकार्ड हा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. विविध शासकीय योजनांसाठी अर्ज करताना रेशनकार्ड आवश्यक ठरते. मात्र पारंपरिक कागदी रेशनकार्डांमुळे बनावट नोंदी, डुप्लिकेट लाभार्थी आणि इतर गैरप्रकार वाढल्याचे समोर आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि आधुनिकता आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच स्मार्ट रेशन कार्ड योजना राबवण्यात येणार आहे. फेब्रुवारीनंतर स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू होणार असून बोगस प्रकारांना आळा बसेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
नक्की कसं असणार आहे स्मार्ट रेशन कार्ड? 
एटीएम कार्डसारखे दिसणारे, पीव्हीसी स्वरूपातील हे शिधापत्रिकेचे कार्ड क्यूआर कोड आणि ई-स्वाक्षरीसह दिले जाणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवणे सोपे होणार असून गैरवापराला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध बसणार आहे.या उपक्रमामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेला डिजिटल स्वरूपात अधिक बळकटी मिळणार आहे.
advertisement
NFSA तसेच शेतकरी कल्याणाशी संबंधित योजनांतील पात्र लाभार्थ्यांना या स्मार्ट पीव्हीसी शिधापत्रिका देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने सुमारे 48 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असून संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. महाऑनलाइनच्या ई-निविदा प्रणालीद्वारे निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याने कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यावर भर दिला जाणार आहे.
advertisement
क्यूआर कोड आणि बायोमेट्रिक पडताळणी
नवीन स्मार्ट रेशन कार्डवर क्यूआर कोड आणि ई-साइन असणार आहे. त्यामुळे कार्ड स्कॅन करून माहिती लगेच तपासता येईल.धान्य घेताना रेशन दुकानात बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) देणे आवश्यक असेल. यामुळे बनावट नावे, एकाच व्यक्तीने दोनदा धान्य घेणे असे प्रकार थांबतील. हे कार्ड पीव्हीसीचे (प्लास्टिकसारखे मजबूत) असल्यामुळे ते सहज फाटणार नाही किंवा खराब होणार नाही. पाऊस, उष्णता अशा कोणत्याही हवामानात ते टिकाऊ राहील.
advertisement
टप्प्याटप्प्याने स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण
शहरात चिंचवड (अ), पिंपरी (ज) आणि भोसरी (क) अशी तीन परिमंडळे कार्यरत आहेत. या भागांमध्ये सुमारे 4 लाख 23 हजार लाभार्थी 260 रेशन दुकानांमार्फत धान्य घेतात. या सर्व लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका एकाचवेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडेल आणि नागरिकांना कोणतीही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
गैरप्रकारांना बसणार आळा, रेशन व्यवस्थेत मोठा बदल, कागदी रेशनकार्ड आता होणार इतिहासजमा
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement