advertisement

मेक्सिकोच्या 'पाब्लो'चा खेळ खल्लास, ड्रग्स माफियाचा एन्काउन्टरमध्ये मृत्यू, हिंसाचाराचा आगडोंब

Last Updated:

एल मेंचो या CJNG संघटनेच्या ड्रग्स माफियाचा लष्करी कारवाईत मृत्यू, मेक्सिकोमध्ये हिंसाचार, भारत सरकारने भारतीयांसाठी तातडीचा इशारा जारी केला.

News18
News18
पाब्लो एस्कोबारच्या पावलावर पाऊल ठेवत मेक्सिकोच्या ड्रग्स माफियानं अख्खं साम्राज्य उभं केलं मात्र त्याच्या याच साम्राज्याला सुरुंग लावला आहे. क्रूर आणि मोड वॉन्टेड ड्रग्स माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एल मेंचो याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. जगातील सर्वात खतरनाक आणि क्रूर ड्रॅग माफियांपैकी एक असलेला नेमेसियो एल मेंचो ओसेगुएरा सर्वांतेस लष्करी कारवाई दरम्यान ठार मारला गेला.
CJNG या संघटनेचा सरगना असलेल्या एल मेंचोला पकडण्यासाठी मेक्सिकन सैन्य आणि फेडरल एजन्सींनी संयुक्त मोहीम राबवली होती. या कारवाईनंतर संपूर्ण मॅक्सिकोमध्ये रस्त्यावर उतरुन हिंसाचार सुरू झाला असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी देखील दूतावासातून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ट्रम्प यांचा दबाव, टॅरिफची भीती
गेल्या काही काळापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ड्रॅग तस्करी रोखण्यासाठी मॅक्सिकोवर मोठा दबाव आणत होते. लष्करी कारवाई किंवा टॅरिफच्या धमकीनंतर मॅक्सिकोने ही कारवाई केली. जलिस्को राज्यातील टापालपा भागात झालेल्या चकमकीत एल मेंचो आणि त्याचे साथीदार गंभीर जखमी झाले होते. मेक्सिको सिटीला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. अमेरिकेने त्याच्या अटकेवर १३६ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.
advertisement
advertisement
५ राज्यांमध्ये हिंसाचार आणि तणाव
एल मेंचोच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रस्त्यावर हिंसाचार सुरू झाला. जलिस्को, मिचोआकान आणि गुआनाहुआतोसह पाच राज्यांमध्ये रस्ते अडवून बस आणि दुकाने पेटवून दिली. विमानतळ परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. खबरदारी म्हणून एअर कॅनडासह अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जलिस्कोच्या गव्हर्नरनी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
advertisement
भारत सरकारने जारी केली अॅडव्हायझरी
मॅक्सिकोमधील भीषण परिस्थिती पाहता अमेरिका आणि कॅनडानंतर आता भारत सरकारनेही आपल्या नागरिकांसाठी तातडीचा इशारा जारी केला आहे. मेक्सिकोमधील भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः जलिस्को, मिचोआकान आणि गुरेरो राज्यांतील भारतीयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून मदतीसाठी +52 55 4847 7539 हा आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे.
advertisement
कोण होता एल मेंचो?
एकेकाळी साधा पोलीस कर्मचारी असलेला एल मेंचो पुढे जगातील सर्वात मोठा ड्रॅग माफिया बनला. फेंटानिलसारख्या घातक अंमली पदार्थांची तस्करी आणि जगभर गुन्हेगारीचं जाळं पसरवण्यात त्याचा मोठा हात होता. त्याच्या एका इशाऱ्यावर मॅक्सिकोमध्ये रक्ताचा सडा पडायचा. आता त्याच्या खात्म्यानंतर त्याचे साम्राज्य विखुरले असून टोळीयुद्ध अधिक हिंसक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
मेक्सिकोच्या 'पाब्लो'चा खेळ खल्लास, ड्रग्स माफियाचा एन्काउन्टरमध्ये मृत्यू, हिंसाचाराचा आगडोंब
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement