advertisement

Bigg Boss Marathi 6 : 'तू चोर आहेस चोर!' प्राजक्ता शुक्रेचा भर घरात संताप, प्रभूच्या अंगावर धावून गेला रोशन Video

Last Updated:

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठी ६ च्या घरात 'पॉवर की' चोरीवरून मोठा राडा झाला आहे. प्राजक्ता शुक्रेची चावी प्रभूने चोरल्याचे समोर आल्यानंतर घरात घमासान सुरू झाले. संतापलेली प्राजक्ता प्रभूला 'चोर' म्हणाली, तर रोशन चक्क त्याच्या अंगावर धावून गेला.

Bigg Boss Marathi 6 : 'तू चोर आहेस चोर!' प्राजक्ता शुक्रेचा भर घरात संताप, प्रभूच्या अंगावर धावून गेला रोशन Video
Bigg Boss Marathi 6 : 'तू चोर आहेस चोर!' प्राजक्ता शुक्रेचा भर घरात संताप, प्रभूच्या अंगावर धावून गेला रोशन Video
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनला आता रंग चढू लागला आहे. घरातील सदस्यांमध्ये आता तीव्र स्पर्धा सुरू झाली असून कुरघोडीचे डाव आता रंगू लागले आहेत. प्राजक्ता शुक्रेकडे असलेल्या पॉवर की चोरी कोणी केली हे समोर आलं आहे. त्यावरून आता घरात घमासान झालं आहे. प्रभू आणि प्राजक्ताच्या वादात रोशनने उडी घेतली. रोशन चक्क प्रभूच्या अंगावर धावून गेल्याचं समोर आलं आहे.
'बिग बॉस'च्या घरात मागील आठवड्यात झालेल्या टास्कमध्ये घरातील चार सदस्यांना पॉवर की मिळाली होती. यामध्ये प्राजक्ता शुक्रेचाही समावेश होता. त्यानंतर प्रभूने संधी साधत थेट प्राजक्ताच्या बॅगेतून पॉवर की लंपास केली. प्राजक्ताकडून पॉवर कीचा शोध सुरू होता. बॅगेत ठेवलेली चावी गायब झाल्यानं प्राजक्ता हवालदिल झाली होती. घरातील सदस्यांच्या बॅगा तपासण्यावरून प्राजक्ताची इतर स्पर्धकांसोबत हमरीतुमरीदेखील झाली.
advertisement

> चोर समोर आला...प्रभूवर बोचरे वार

बिग बॉसच्या नव्या ट्रेलरनुसार प्राजक्ताची 'पॉवर की' लंपास कोणी केली हे समोर आलं आहे. प्रभूनं चोरी केल्याचं उघड झाल्यानंतर प्राजक्ताने तू चोर आहेस चोर... असा वार केला.
ज्या सदस्याकडे पॉवर की असणार, त्याला पॉवर कीची सगळी पॉवर जाणार असल्याचे बिग बॉसने जाहीर केले. त्यानंतर प्राजक्ताची चिंता आणखीच वाढली. प्रभूकडे पॉवर की असल्याचे उघड झाल्यानंतर प्राजक्ताने अतिशय कमजोर, चोर असल्याचे म्हटले.
advertisement

> रोशनलाही नडला प्रभू...

प्रभूवर रोशननेही कमेंट केली. त्यावर प्रभूनं हो, मी चोरली काय करणार? असा सवाल केला. त्यानंतर प्रभू आणि रोशनमध्ये वादावादी झाली. यातूनच रोशन अचानकपणे प्रभूच्या अंगावर धावून गेला. त्याच वेळी राखीनं रोशनला अडवलं. आता बिग बॉसच्या घरात या पॉवर कीमुळे गेम फिरणार की बिग बॉस स्वत: ट्विस्ट आणणार हे लवकरच स्पष्ट होणार.
advertisement
advertisement

> सचिन कुमावत घराबाहेर...

सहाव्या आठवड्यामध्ये रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. रविवारच्या एपिसोडमध्ये गायक सचिन कुमावतला घराबाहेर जावं लागलं. बिग बॉसच्या घरातील त्यांचा खेळ म्हणावा तितका स्ट्राँग नसल्यामुळे आणि अनेकदा स्वत:साठी स्टँड न घेतल्यामुळे प्रेक्षकांकडून त्यांना कमी मते मिळाली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'तू चोर आहेस चोर!' प्राजक्ता शुक्रेचा भर घरात संताप, प्रभूच्या अंगावर धावून गेला रोशन Video
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement