Bhiwandi News : काळाचा क्रूर घाला! बॅट शोधण्यासाठी गेलेलं पाऊल मृत्यूच्या दारात पडलं; परिसर सुन्न
Last Updated:
Bhiwandi Crime : भिवंडी शहरात एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे आणि त्याचे कारण म्हणजे एक क्रिकेटची बॅट. नेमकं शहरात काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.
भिवंडी : भिवंडी शहरातील समरू बाग परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. ज्या घटनेत विहिरीत पडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. बिलाल अंसारी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका बॅटने घेतला बळी
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल यांच्या घराशेजारी एका जीन्स कंपनीचे कंपाउंड आहे. त्याच ठिकाणी एक जुनी आणि वापरात नसलेली विहीर आहे. काही दिवसांपूर्वी बिलालची क्रिकेट बॅट खेळताना चुकून या विहिरीत पडली होती. रविवारी ती बॅट बाहेर काढण्यासाठी बिलाल विहिरीत उतरला.
मात्र विहिरीत उतरल्यानंतर तोल गेल्याने किंवा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
advertisement
दुर्दैवी घटनेने परिसर सुन्न
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. जुनी आणि उघडी विहीर असल्याने सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 9:04 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Bhiwandi News : काळाचा क्रूर घाला! बॅट शोधण्यासाठी गेलेलं पाऊल मृत्यूच्या दारात पडलं; परिसर सुन्न








