advertisement

Amitabh Bachchan: "एक 'पण' येतो आणि माझा दिवस...", 40 वर्षात पहिल्यांदाच घडलं असं काही... चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

Last Updated:
Amitabh Bachchan: गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे, ज्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
1/11
चित्रपट असो, वैवाहिक जीवन असो किंवा मग त्यांचे विचित्र ब्लॉग असो, 83 वर्षीय अमिताभ बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. मात्र, गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे, ज्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

2/11
मुंबईतील जुहू परिसरात दर रविवारी एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतं. ऊन असो वा पाऊस, हजारो डोळे एकाच दिशेला लागलेले असतात, तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ शहेनशहा आपल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी घराबाहेर येतात.

3/11
पण, कालचा रविवार मात्र चाहत्यांसाठी काहीसा निराशेचा ठरला. तासनतास ताटकळत उभे राहिलेले चाहते 'बिग बी'ची एक झलक पाहण्यासाठी आसुसले होते, पण 'जलसा'चे दरवाजे काल उघडलेच नाहीत.

4/11
दर रविवारी अमिताभ बच्चन न चुकता आपल्या चाहत्यांचे प्रेम स्वीकारण्यासाठी गेटवर येतात. पण काल जेव्हा दुपारी 3 वाजले, 4 वाजले आणि तरीही अमिताभ बाहेर आले नाहीत, तेव्हा चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

5/11
प्रकृती ठीक नाही की आणखी काही? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच, खुद्द बिग बी यांनी आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आणि गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले.

6/11
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ते सध्या त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. त्यांनी चाहत्यांना विनंती केली की, सध्या त्यांनी रविवारी जलसाबाहेर गर्दी करू नये.

7/11
त्यांनी लिहिले,
त्यांनी लिहिले, "काम पूर्ण जोमाने सुरू आहे, पण त्यात एक 'पण' येतो आणि माझा दिवस तिथेच संपतो. आज रविवार आहे, पण दुर्दैवाने मी जलसाच्या गेटवर येऊ शकणार नाही. त्यामुळे प्रवासाचा त्रास करून घेऊ नका आणि आपली ऊर्जा वाचवा. आपण लवकरच भेटू!"
advertisement
8/11
कामाच्या ओझ्यामुळे आणि व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना चाहत्यांना भेटता आले नाही, हे समजताच चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

9/11
अमिताभ बच्चन यांनी नुकताच आपल्या 'कौन बनेगा करोडपती 17' या शोचा समारोप केला. या शोच्या शेवटच्या भागात ते अत्यंत भावूक झाले होते.

10/11
प्रेक्षकांचे आभार मानताना ते म्हणाले होते,
प्रेक्षकांचे आभार मानताना ते म्हणाले होते, "माझ्या आयुष्यातील एक तृतीयांश पेक्षा जास्त काळ मी तुमच्यासोबत घालवला आहे, हे माझे भाग्य आहे. जेव्हा मी हसलो तेव्हा तुम्ही हसलात, जेव्हा माझे डोळे पाणावले तेव्हा तुमच्याही डोळ्यात पाणी आले. तुम्ही आहात म्हणून हा खेळ आहे आणि हा खेळ आहे म्हणून मी आहे."
advertisement
11/11
अमिताभ बच्चन वयाच्या 83 व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करत आहेत. सध्या त्यांच्याकडे 'कल्कि 2898 एडी' आणि 'ब्रह्मास्त्र' चे बहुप्रतीक्षित सीक्वेल्स असे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. याच चित्रपटांच्या शूटिंगमध्ये ते सध्या अहोरात्र व्यग्र असल्याचे समजते.

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement