advertisement

फिल्डरची गरजच उरली नाही, वर्ल्डकपमध्ये अजब राडा; प्रकार पाहून अंपायरही चक्रावले, Video

Last Updated:

T20 World Cup: श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सुपर 8 सामन्यात दुशन हेमंथा विचित्र पद्धतीने बाद झाला, हा दुर्मीळ प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल.

News18
News18
मुंबई: टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 8 फेरीत श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामना पालेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला. मात्र या सामन्यात एक असा धक्कादायक आणि दुर्मीळ प्रसंग घडला ज्यामुळे प्रेक्षक काही क्षण स्तब्ध झाले. श्रीलंकेचा फलंदाज दुशन हेमंथा अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला आणि हा व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला.
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेमी ओव्हर्टनच्या षटकात हा प्रकार घडला. एका चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात हेमंथाच्या हातातून बॅट सुटली आणि नियंत्रण सुटल्यामुळे त्याची बॅट थेट स्टंप्सवर जाऊन आदळली. त्यामुळे तो ‘हिट-विकेट’ झाला. क्रिकेटमध्ये अशी बाद होण्याची पद्धत अत्यंत दुर्मीळ मानली जाते आणि त्यामुळे या विकेटची अधिक चर्चा झाली.
advertisement
या आधीच्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 9 बाद 146 धावांवर रोखले होते. डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागे हा या डावाचा नायक ठरला. त्याने 4 षटकांत 26 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याला महिष थीक्षाना आणि दिलशान मदुशंका यांनीही मोलाची साथ दिली.
इंग्लंडची सुरुवातही डळमळीत झाली होती. पॉवरप्लेनंतर त्यांची धावसंख्या 2 बाद 37 अशी होती. जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांना वेल्लालागेने स्वस्तात बाद करत इंग्लंडवर दबाव निर्माण केला. टॉम बॅन्टन आणि सॅम करन यांनाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे फिल सॉल्टवर संपूर्ण जबाबदारी आली. सॉल्टने 40 चेंडूत 62 धावांची झंझावाती खेळी करत चौकार-षटकारांची आतषबाजी केली, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही.
advertisement
सॉल्ट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाचा वेग आणखी मंदावला आणि ते 146 धावांवरच रोखले गेले. हे लक्ष्य गाठणे श्रीलंकेसाठी शक्य वाटत होते, पण फलंदाजीदरम्यान नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या. त्यात हेमंथाचा हिट-विकेटची चर्चा जास्त झाली.
एकीकडे गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडला मर्यादित धावसंख्येवर रोखले, तरी फलंदाजांना त्या कामगिरीला न्याय देता आला नाही. हेमंथाच्या अजब पद्धतीने बाद होण्याच्या प्रकाराने श्रीलंकेचा पाठलाग अधिक कठीण झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
फिल्डरची गरजच उरली नाही, वर्ल्डकपमध्ये अजब राडा; प्रकार पाहून अंपायरही चक्रावले, Video
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement