advertisement

सावधान! 'या' 5 कारणांमुळे बँक फ्रीज करु शकतं तुमचं अकाउंट, अवश्य घ्या जाणून 

Last Updated:

बँक अकाउंट फ्रीज होणे म्हणजे एखाद्या फायनेंशियल इंस्टीट्यूशनने त्या अकाउंटसंबंधित फंड आणि ट्रांझेक्शनपर्यंत अॅक्सेसवर काही काळासाठी बंदी घालणए आहे. या बंदीची अनेक कारणं असू शकतात.

बँक अकाउंट फ्रीज
बँक अकाउंट फ्रीज
मुंबई : बँकांजवळ तुमचे अकाउंट फ्रीज (अस्थायीरित्या बंद) करण्याचा अधिकार असतो. यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या अकाउंटमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे किंवा इतर आर्थिक देवाण-घेवाण करण्यात असमर्थ असू शकतात. ज्यामुळे रोजच्या कामांवर परिणाम होऊ शकतो.
यामुळे समजून घेणं गरजेचं आहे की, कोणत्या परिस्थितीत बँका हे पाऊल उचलतात. कारणांची योग्य माहिती असल्यावर तुम्ही वेळेवर सतर्क राहू सकता आणि आपले आर्थिक हितांची चांगली सुरक्षा करु शकता. चला समजून घेऊया की, कोणत्या परिस्थितींमध्ये तुमचं अकाउंट फ्रीज होऊ शकतं.
संशयास्पद फसवणूक किंवा फसव्या व्यवहार
बँकेला तुमच्या अकाउंटमध्ये अनधिकृत व्यवहार, ओळख चोरी किंवा इतर कोणत्याही आर्थिक फसवणूकीचा संशय आला तर ती त्वरित कारवाई करते. बँका अत्याधुनिक देखरेख प्रणालींसह अकाउंटवर लक्ष ठेवतात. कोणतीही असामान्य किंवा संशयास्पद गतिविधी दर्शवली जाते आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी खाते तात्पुरते फ्रीज केले जाते.
advertisement
12 कोर्ट आदेश किंवा सरकारी तपास
बँकांना न्यायालय, आयकर विभाग किंवा इतर कायदे प्रवर्तन एजेंसीच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य असते. तुमच्या अकाउंटवर गार्निशमेंट ऑर्डर, कायदेशीर विवाद किंवा कोणत्याही तपासासंदर्भात फ्रीज निर्देश जारी झाला तर हे प्रकरणं निराकरण होईपर्यंत बँक देवाण-घेवाण थांबवू शकते.
advertisement
मनी लॉन्ड्रिंगची शंका 
अँटी-मनी लॉन्ड्रिंग नियमांअंतर्गत बँका प्रत्येक संशयास्पद ट्रांझेक्शनवर नजर ठेवतेय. एखाद्या खात्यात अवैध धनाच्या देवाण-घेवाण किंवा दहशतवादी वित्तपुरवठा सारख्या कारवाया संशयास्पद असतील तर, चौकशी पूर्ण होईपर्यंत खाते फ्रीज केले जाऊ शकते.
केवायसी किंवा अकाउंटच्या देशभालीत कमतरता 
KYC अपडेट न करणे, आवश्यक दस्तावेज जमा न करणे. अकाउंटमध्ये सातत्याने निगेटिव्ह बॅलेन्स किंवा ओव्हरड्राफ्टच्या स्थितीतही अकाउंट फ्रीज होऊ शकतं. जोपर्यंत ग्राहक आवश्यक औपचारिकता पूर्ण करत नाही. बँक देवाण-घेवाण थांबवू शकते.
advertisement
असामान्य किंवा अचानक वाढलेल्या कृती
अकाउंटमध्ये अचानक खुप मोठी रक्कम जमा किंवा काढली जात असेल. खर्च करण्याच्या पॅटर्नमध्ये असामान्य बदल दिसत असेल किंवा वारंवार हाय-व्हॅल्यू ट्रांझेक्शन होत असतील तर बँक सतर्क होते.
सुरक्षेच्या कारणास्तव अशा परिस्थितींमध्ये अकाउंट अस्थायीरित्या फ्रिज करुन तपास केला जाऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
सावधान! 'या' 5 कारणांमुळे बँक फ्रीज करु शकतं तुमचं अकाउंट, अवश्य घ्या जाणून 
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement