advertisement

रिटायरमेंटसाठी किती बचत गरजेची? जाणून घ्या प्रत्येक वयानुसार योग्य लक्ष्य

Last Updated:
रिटायरमेंट प्लॅनिंग हे ऐकताच आपल्या डोक्यात मोठे-मोठे आकडे येऊ लागतात. मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी एकच रक्कम योग्य नसते. वय, उत्पन्न आणि जीवनशैलीच्या हिशोबाने बचतीचं लक्ष्य बदलतं. जाणून घेऊया प्रत्येक दशकात किती बचत करणे गरजेचे आहे.
1/7
नवी दिल्ली : रिटायरमेंट प्लॅनिंगविषयी बोलायचं झाल्यास, नेहमीच 3-5 कोटी रुपयांसारखे मोठे आकडे समोर येतात. यामुळे लोकं घाबरतात. मात्र सत्य हे आहे की, प्रत्येक व्यक्तीची गरज, शहर , लाइफस्टाइल आणि उत्पन्न हे वेगवेगळं असतं.

2/7
याच कारणामुळे एका ठराविक रक्कम सर्वांवर लागू होऊ शकत नाही. बचत ही प्रत्येक दशकाच्या हिशोबाने समजून घेणे ही बेस्ट पद्धत आहे. तुम्ही योग्य वयात सवय लावली तर पुढे चालून ओझं कमी होतं.

3/7
20 व्या वर्षी : 20 च्या दशकात सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे सवय करुन घेणे. योग्य वेळी मोठी रक्कम जमा करणे लक्ष्य नसते. तुम्ही तुमच्या टेक-होम सॅलरीचा 15-20 टक्के नियमित गुंतवणूक करु शकत असाल. तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. वयाच्या 25 व्या वर्षी 10,000 रुपये महिन्याची गुंतवणुकही 30-35 वर्षात कंपाउंडिंगमुळे मोठ्या रकमेत रुपांतरीत होऊ शकते.

4/7
नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी, Employees’ Provident Fund (EPF) एक भक्कम पाया प्रदान करतो. यासोबतच, इक्विटी म्युच्युअल फंडात SIP सुरू केल्याने वाढीला चालना मिळू शकते. वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत किमान एक वर्षाचे उत्पन्न जमा करण्याचे ध्येय ठेवा.

5/7
30 चे दशक हे उत्पन्न वाढण्याचा काळ आहे, पण त्याचबरोबर घर, मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत्या खर्चाचाही काळ आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा निवृत्ती नियोजनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. 35 वर्षांच्या वयापर्यंत वार्षिक उत्पन्नाच्या 2-3 पट आणि 40 वर्षांच्या वयापर्यंत उत्पन्नाच्या 4-5 पट लक्ष्यित गुंतवणूक उपयुक्त मानली जाते. यामध्ये ईपीएफ, एनपीएस, इक्विटी फंड आणि इतर दीर्घकालीन गुंतवणूक समाविष्ट असावी. तुम्ही उशिरा सुरुवात केली असेल, तर या दशकात तुम्ही तुमचा बचत दर 25-30 टक्क्यांपर्यंत वाढवावा. केवळ पगारवाढ तुमचे भविष्य सुरक्षित करत नाही; तुमचा गुंतवणूक दर देखील वाढला पाहिजे.

6/7
40 चे वय : 40 या वयानंतर रिटायरमेंट आता जास्त दूर नाही. मुलांचं उच्च शिक्षण, आरोग्य आणइ करियरची अनिश्चितता सारखे मुद्दे समोर येतात. आता अंदाज नाही, थेट गणना करण्याची गरज असते. तुम्हाला वयाच्या 60 पर्यंत दरमहा 2 लाख रुपये खर्च करायचे असेल तर महागाई आणि संभाव्य रिटर्न लक्षात घेऊन लक्ष्य ठरवावे लागेल. 45 च्या वयापर्यंत 6-8 पट वार्षिक उत्पन्न आणि 50 पर्यंत 8-10 टक्के उत्पन्नाचा गुंतवणूक एक सामान्य मानक असू शकते. पण हे कमी असेल तर खर्च नियंत्रित करा आणि गुंतवणूक वाढवा.

7/7
वय 50: वयाच्या 50 वर्षांनंतर, वाढीपेक्षा संरक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. निवृत्तीपूर्वी तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 12-15 पट निधी असणे हे ध्येय सुरक्षित मानले जाते, जरी हे जीवनशैली आणि पेन्शनच्या गरजांवर अवलंबून असेल. यावेळी मालमत्ता वाटप अत्यंत महत्त्वाचे बनते. जास्त इक्विटीमुळे बाजारातील चढउतारांचा धोका वाढू शकतो, तर खूप कमी वाढीमुळे भविष्यात आर्थिक अडचणी येऊ शकतात. या वयापर्यंत मोठी कर्जे, विशेषतः होम लोन, दूर करण्याचा प्रयत्न करा. शेवटी, कोणताही एक जादूचा आकडा नाही, परंतु लवकर सुरुवात करणे आणि नियमितपणे गुंतवणूक करणे तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी अधिक पर्याय देते.

करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement