Amalaki Ekadashi 2026: फेब्रुवारीच्या शेवटी आमलकी एकादशी; आवळ्याचे विशेष व्रत, पूजा विधींनी श्रीहरीची कृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशी दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणं खूप फायदेशीर मानलं जातं, कारण शास्त्रानुसार आवळा भगवान विष्णूंच्या अश्रूंपासून उत्पन्न झाला होता. यात सर्व देवी-देवतांचा वास असतो. जो माणूस या दिवशी मनापासून उपवास ठेवतो, त्याच्यासाठी मोक्षाचा..
मुंबई : आपल्याकडे हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. महिन्यातून 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व असते. फेब्रुवारीत येणाऱ्या दुसऱ्या म्हणजे आमलकी एकादशीबद्दल बोलत आहोत, यावर्षी 27 फेब्रुवारीला ती साजरी केली जाईल. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणं खूप फायदेशीर मानलं जातं, कारण शास्त्रानुसार आवळा भगवान विष्णूंच्या अश्रूंपासून उत्पन्न झाला होता. यात सर्व देवी-देवतांचा वास असतो. जो माणूस या दिवशी मनापासून उपवास ठेवतो, त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग खुला होतो आणि सुख-समृद्धी मिळते. आमलकी एकादशीची तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊ.
आमलकी एकादशी 2026 - पंचांगानुसार, यावर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीची सुरुवात 26 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 12:33 वाजता होईल. तर, या तिथीची सांगता 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:32 वाजता होईल. त्यामुळे आमलकी एकादशी 27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल.
आमलकी एकादशी 2026 शुभ योग आणि मुहूर्त -
advertisement
पंचांगानुसार, आमलकी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, रवि, आयुष्मान आणि सौभाग्य योग जुळून येत आहेत. या योगांमध्ये पूजा केल्याने दुप्पट फळ मिळतं. तसंच, या दिवशी आवळ्याच्या झाडाच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 6:48 ते 11:08 पर्यंत असेल. आमलकी एकादशीच्या व्रताचे पारण (उपवास सोडणे) 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपासून ते 9 वाजून 5 मिनिटांपर्यंत या वेळेत केलं जाईल.
advertisement
आमलकी एकादशीचे महत्त्व
विष्णू पुराणानुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचा विशेष विधी आहे. असं केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. तसंच माणसाला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो असं मानलं जातं. या दिवशी व्रत केल्याने कर्ज, मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्या हळूहळू दूर होतात अशी मान्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 8:32 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Amalaki Ekadashi 2026: फेब्रुवारीच्या शेवटी आमलकी एकादशी; आवळ्याचे विशेष व्रत, पूजा विधींनी श्रीहरीची कृपा







