TV Cleaning Tips : टीव्ही साफ करतांना 90% लोक करतात 'ही' चूक! स्क्रीनवर कायमचे पडू शकतात ब्लॅक स्पॉट
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
TV screen cleaning : हल्लीच्या टीव्हीची स्क्रीन काचेची नसते, तर ती एक अतिशय पातळ, प्लास्टिकसारखी पोलरायझिंग फिल्म असते. म्हणूनच टीव्ही स्वच्छ करताना आपण काही चुका टाळल्या पाहिजेत.
advertisement
पूर्वीच्या टीव्हीमध्ये काचेच्या स्क्रीन असायच्या, ज्या आपण फोम क्लीनरने स्वच्छ करू शकत होतो. पण हल्ली बहुतांश लोक एलसीडी टीव्हीच विकत घेतात. म्हणून या टीव्ही ग्लास क्लीनरने स्वच्छ कारण टाळावं. कारण त्यामुळे एलसीडी स्क्रीन खराब होऊ शकते. हल्ली टीव्ही विकत घेतल्यानंतर मिळणाऱ्या मॅन्युअल किंवा गाईडमध्ये लिहिलेलं असतं की, हा टीव्ही ग्लास क्लीनरने स्वच्छ करू नका.
advertisement
पूर्वीचे टीव्ही काचेच्या स्किन लावलेले असायचे. अशा टीव्हीवर साबण किंवा फोम लावल्यास ते आत जायचं नाही आणि काचही स्वच्छ व्हायची. पण टीव्हीतून खूप जास्त प्रकाश यायचा आणि हा आपल्या डोळ्यांसाठी घातक असायचा. त्यामुळेच हल्ली एलसीडी टीव्हीवर अँटी-ग्लेअर कोटिंग असते, जे काचेवर पडणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण कमी करतं.
advertisement
advertisement
पूर्वीच्या टीव्हींना काचेचं पूर्णपणे सीलबंद बाह्य आवरण असायचं. पण हल्लीच्या एलसीडी टीव्हींना बाजूला खूप पातळ बेझल्स असतात. टीव्ही स्क्रीनवर कोणताही द्रव पदार्थ लावल्यास तो फ्रेमच्या खालच्या भागात झिरपतो, जिथे टीव्हीचा टी-कॉन बोर्ड आणि नाजूक डिस्प्ले रिबन केबल्स असतात. जर तिथे पाणी साचलं, तर शॉर्ट-सर्किट होऊ शकतं. त्यामुळं स्क्रीनवर काळ्या किंवा रंगीत रेषा दिसू शकतात आणि पॅनल निकामी होऊ शकतं.
advertisement
सॅमसंगच्या मते, काही एलसीडी स्क्रीन क्लीनर्स अँटी-ग्लेअर कोटिंगला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळेच टीव्ही स्क्रीनवर कधीही साबण, क्लिनिंग पावडर किंवा अल्कोहोल, बेंझिन किंवा अमोनियासारखी काच साफ करणारी रसायनं वापरू नका. अनेक वेबसाइट्स टीव्ही स्क्रीन विंडेक्स, व्हिनेगर, मिथाइलेटेड स्पिरिट्स, ग्लास क्लीनर किंवा ऑल-पर्पज क्लीनर्सने स्वच्छ करण्याचा सल्ला देतात. पण ही उत्पादने प्रकर्षाने टाळा.
advertisement
advertisement
टीव्ही स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी खास क्लीनर असतं, तुम्ही ते वापरू शकता. पण यासाठी विश्वासार्ह आणि नामांकित कंपनीचेच प्रोडक्ट वापरावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, क्लीनर कधीही थेट स्क्रीनवर स्प्रे करू नका. आधी थोडंसं लिक्विड कापडावर घ्या आणि नंतर त्या कापडाने टीव्हीची स्क्रीन हळूवारपणे पुसा.
advertisement









