advertisement

DigiLocker बनलं आणखी स्मार्ट! एका क्लिकमध्ये वीज बिल होईल डाउनलोड, सोपं होईल काम

Last Updated:

DigiLocker हे आपल्या महत्त्वाच्या डॉक्यमेंट्ससाठी वापरले जाणारे भारी फीचर आहे. आता यामध्ये आणखी एक नवं फीचर आलंय. ज्यात तुम्ही वीज बिल डाउनलोड करू शकता. चला पाहूया ते कसं डाउनलोड करता येईल.

डिजीलॉकर
डिजीलॉकर
मुंबई : डीजीलॉकर हे अ‍ॅप सर्नेवांनाच माहिती असेल. आपले महत्त्वाचे डॉक्यूमेंट या अ‍ॅपवर सुरक्षित सेव्ह राहतात. ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्यमेंट ठेवायची गरज नसते. सर्व काही आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं. आता या प्लॅटफॉर्मवर एक नवं फीचर अ‍ॅड केलंय. ज्यामुळे यूझर्स आपलं वीज बिल डिजिटल रुपात सहच अ‍ॅक्सेस करू शकतात. हे फीचर डिजिटल इंडिया अभियाना अंतर्गत आणलंय गेलंय. सरकारी सेवा पेपरलेस आणि सोप्या बनवणे हा यामागील उद्देश आहे.
सध्याच्या काळात लोक आपले आश्यक डॉक्यूमेंट डिजिटल रुपात ठेवणं पसंत करतात. हीच गरज लक्षात घेता DigiLocker ने ही सुविधा सुरू केलीये. ज्यामुळे यूझर्सला वारंवार वीज बिलासाठी वेबसाइट किंवा ऑफिसवर जावं लागू नये. आता सर्व डॉक्यूमेंट्स एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवले जाऊ शकतील.
हे फीचर कसं काम करतं?
या फीचरचा वापर करण्यासाठी यूझर्सला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरने DigiLocker मध्ये लॉगिन करावं लागेल. यानंतर 6 अंकांचा सिक्योरिटी पीन टाकून डॅशबोर्डवर जाता येईल.
advertisement
डॉक्यूमेंट सेक्शनमध्ये जाऊन ‘इलेक्ट्रिसिटी बिल’ केल्यावर वेगवेगळ्या राज्यांचे वीज बिल प्रदातांची लिस्ट दाखवली जाईल. जसं की, CESC, TPDDL आणि JUSCO.
यानंतर यूझर्सला आपला कंज्यूमर नंबर आणि मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. माहिती सबमिट करताच DigiLocker थेट संबंधित कंपनीच्या डेटाबेसवरुन बिल काढते आणि अ‍ॅपमध्ये दाखवते.
advertisement
याचे फायदे काय?
वीज बिल ‘Verified’ टॅगसह मिळतं.
कोणत्याही वेळी अ‍ॅक्सेस केलं जाऊ शकतं.
डाउनलोड आणि शेअर करण्याची सुविधा.
दुसरे डॉक्यूमेंट्स म्हणजे Aadhaar सह स्टोर करण्याची सुविधा.
सुरक्षित आणि सोपे 
या फीचरमध्ये यूझर्सला मॅन्युअली डॉक्यूमेंट अपलोड करण्याची गरज नसते. सर्व रेकॉर्ड थेट अधिकृत सोर्सने येतात. ज्यामुळे त्याची व्हॅलिडिटी टिकून राहते. सोबतच सिक्योर लॉगइन आणि पीन सिस्टम डेटाला सुरक्षित ठेवते.
advertisement
हे फीचर खास का?
हे फीचर तुमचा वेळ वाचवते. यासोबतच पेपरलेस सिस्टमला प्रोत्साहन देते. आता यूझर्स आपलं वीज बिल सहज मॅनेज करू शकतात आणि गरज पडल्यावर वापरू शकतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
DigiLocker बनलं आणखी स्मार्ट! एका क्लिकमध्ये वीज बिल होईल डाउनलोड, सोपं होईल काम
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement