Thane News : लोकलची गर्दी अन् रस्त्याच्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, मुख्यमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला
Last Updated:
Thane News : कुर्ला ते वांद्रे दरम्यान सुरु झालेली एक नवीन सेवा आता ठाण्यातही सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. नेमका कोणत्या मार्गावरील प्रवाशांना त्याच्या जास्त फायदा होणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी आणि भविष्यात प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. येत्या काही दिवसांत नागरिकांना एक नव्या वाहतूक साधनातून प्रवास करता येणार आहे.
वाहतूक कोंडीवर मोठा उपाय
ठाणे शहरात नागरिकांचा दररोजचा प्रवास अधिक सोपा आणि वाहतककोंडी मुक्त होण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यात मेट्रो आणि अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची काम केली जात आहे. पण आता ठाण्यातील नागरिकांना थेट पॉड टॅक्सीतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत कुर्ला ते वांद्रे दरम्यान पहिला पॉड टॅक्सी प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
advertisement
कधी होणार सुरुवात?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातच पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकल्पाची घोषणा केली. ज्यात त्यांनी सांगितले की, ठाणे शहरात प्रवाशांचा प्रवास जलद होण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरेल. सध्याच्या स्थितीला या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरच भूमीपूजन करण्यात येईल.
नेमकी काय आहे ही पॉड टॅक्सी?
पॉड टॅक्सी ही एक वाहतूकीचे साधन असून ही पूर्णपणे स्वयंचलित असणार आहे. याचा आकार लहान कारसारखा दिसणार आहे. पॉड टॅक्सी ही रस्त्यावरुन धावणार नसून ती एका विशिष्ट करण्यात येणाऱ्या ट्रॅकवरुनच हवेत धावते. यामध्ये साधारण 4 ते 6 प्रवासी बसू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 10:48 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : लोकलची गर्दी अन् रस्त्याच्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, मुख्यमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला







