Weather Alert: दुपारी कडाक्याचं ऊन संध्याकाळी तुफान गारांचा पाऊस, 12 जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather Update: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व तुफान गारपीट, अनेक जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान, पुढचे काही दिवस वादळी पावसाचा इशारा, उकाडाही वाढणार.
मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण आहे. उकाडा प्रचंड वाढलाय तर त्याच वेळी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. गारपिटीमुळे उभ्या पिकांचं आणि बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे. पुढचे तीन दिवस तुफान पाऊस राहणार आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज असेल त्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा दिला आहे. तर कोकण वगळता महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल.
कोकणात काय स्थिती?
मुंबई आणि पालघर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस तुरळक पाऊस होणार आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज आणि उद्या ही स्थिती राहील त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होणार असून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा
जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगरमध्ये आज 60 किमी वेगाने वारे वाहतील आणि तुफान गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उद्या आणि परवा पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होईल. त्यानंतर रिमझिम पाऊस पडेल असा इशारा दिला आहे.
advertisement
घाटमाथ्यावर काय स्थिती?
पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा सांगली जिल्ह्यांत आज आणि उद्या गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. 60 ते 50 किमी सोसाट्याचा वारा राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस असेल. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री घेऊन बाहेर पडा असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
पावसामुळे महाराष्ट्रात कुठे किती नुकसान?
नांदेड जिल्हयातील अनेक भागात रात्री मोठा पाऊस झाला. 3 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. रात्री नांदेड शहर आणि जिल्हयात अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नांदेड शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. शिवाय ग्रामीण भागात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
advertisement
बीडच्या ग्रामीण भागात पावसाची नोंद
बीडच्या माजलगाव तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने झोडपले.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसा सोबत वादळी वाऱ्यामुळे पिकाचं प्रचंड नुकसान झाले आहे. पायतळवाडी, चिंचगव्हाण, केसापुरी, किट्टी आडगाव तसेच इतर ग्रामीण भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली.
या अवकाळी पावसामुळे कापूस, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. विशेषतः काढणीसाठी तयार असलेला गहू आणि हरभरा पिक जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर परिसरात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती
advertisement
जळगावात पावसानं मोठं नुकसान
जळगाव जिल्ह्यातील बोदवड शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून सुमारे दीड ते दोन तास झालेल्या अवकाळी पावसामुळे बोदवड शिवारात ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. काढलेला ज्वारी पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. तीन दिवसाच्या विश्रांती नंतर निफाड तालुक्यात पावसासोबत तुफान गारपीट झाली. पिकांसोबत द्राक्षे बागांचे मोठं नुकसान झालंय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement
पुणेकरांची तारांबळ
पुणे शहाराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर भागात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून कसरत करत जावं लागलं. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चागलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
नाशिकमध्ये पावसाने झोडपलं
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाली. शिवडी, उगावला परिसराला पावसानं चांगलंच झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
advertisement
वर्ध्यात विचित्र वातावरण
वर्ध्याचा पारा 41.6 अंशावर पोहोचला आहे. जिल्ह्यात सूर्य तळपल्यानं अंगाची झाली काहिली झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सामान्य नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. मार्च एडिंगला मे महिन्याचा फील येत आहे. येत्या दोन दिवसात उन्हासोबत पावसाचा वर्तविला अंदाज आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून करण्यात आलं आवाहन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 7:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Alert: दुपारी कडाक्याचं ऊन संध्याकाळी तुफान गारांचा पाऊस, 12 जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट










