Pumpkin Fritters : तुम्ही कधी भोपळ्याची भजी खाल्लीय? दुपारच्या नाश्त्यासाठी बेस्ट पर्याय, बनतातही अगदी झटपट!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Pumpkin fritters recipe : भोपळा आपल्या शरीरासाठी चांगला असतो. उन्हाळ्यात भोपळा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, असं म्हणतात. ही भोपळ्याची भजी खूप स्वादिष्ट बनतात.
मुंबई : भजी खायला कोणाला आवडत नाहीत. आपण कांदा भजी, मूग भजी, बटाटा भजी बऱ्याचदा खातो. पण तुम्ही कधी भोपळ्याची भजी खाल्लीय का? नसेल तर ही हटके रेसिपी एकदा ट्राय करा. भोपळ्याची भजी पचायला हलकी असतात आणि भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. जे लोक बटाटे खात नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही भजी तुम्हाला नक्की आवडतील.
भोपळा आपल्या शरीरासाठी चांगला असतो. उन्हाळ्यात भोपळा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, असं म्हणतात. ही भोपळ्याची भजी खूप स्वादिष्ट बनतात. तुम्ही एकदा हे खाल तर वारंवार बनवाल. तुम्ही दुपारच्या छोट्या भुकेसाठी नाश्त्यात बनवू शकता.
भोपळ्याची भजी बनवण्यासाठी साहित्य..
गृहिणी मनीषा सिंग यांनी लोकल 18 ला सांगितलं की, भजी बनवण्यासाठी तुम्हाला खूप साहित्याची गरज नाही. त्यासाठी फक्त बेसन, किसलेला भोपळा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, आले, धणे, लाल तिखट, पुदिन्याची पाने, मीठ आणि तळण्यासाठी तेल लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी-जास्त करून चव वाढवू शकता.
advertisement
भोपळ्याची भजी बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी एक ताजा, कोवळा भोपळा घ्या. तो स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. भोपळा किसून एका मोठ्या भांड्यात टाका.
- नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि किसलेलं आलं घाला.
- आता या मिश्रणात बेसन, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि चवीनुसार मीठ घाला.
advertisement
- हे सर्व व्यवस्थित मिसळून घट्ट मिश्रण तयार करा. मिश्रणात पाणी टाकण्याची गरज पडणार नाही. भोपळ्याला त्याच पाणी असतं.
- आता एका कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.
- तेल गरम झाल्यावर तयार केलेले मिश्रण थोडे थोडे करून हाताने किंवा चमच्याने टाका.
- ही भजी दोन्ही बाजूंनी एकसारखी तळून सोनेरी तपकिरी होईपर्यंत हलक्या हाताने उलटा.
advertisement
भजी कुरकुरीत आणि सोनेरी झाल्यावर ती खाण्यासाठी तयार आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. ही भोपळ्याची भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Pumpkin Fritters : तुम्ही कधी भोपळ्याची भजी खाल्लीय? दुपारच्या नाश्त्यासाठी बेस्ट पर्याय, बनतातही अगदी झटपट!










