advertisement

प्रवासाचा प्लॅन बदला! पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसह अहमदाबाद हायवेवर वाहनांच्या 4 ते 7 किमीपर्यंत रांगा; भर उन्हात प्रवाशांचे हाल

Last Updated:

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने हजारो प्रवासी तासनतास अडकून पडले आहेत.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसह अहमदाबाद हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसह अहमदाबाद हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याला जोडणाऱ्या दोन मुख्य महामार्गांवर आज सकाळपासूनच भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने हजारो प्रवासी तासनतास अडकून पडले आहेत.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३-४ किमीचा 'जॅम'
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवासाचे नियोजन करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आडोशी बोगदा ते मिसिंग लिंक (खालापूर एंड) पर्यंत वाहनांच्या तब्बल ३ ते ४ किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. या कोंडीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. घाट विभागात वाहनांची संख्या वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
advertisement
मुंबई-अहमदाबाद हायवेवर ७ किमीचा 'महाथरार'
दुसरीकडे, पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मनोर येथील हालोली ते वरई दरम्यान ६ ते ७ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर पहाटेपासूनच ही कोंडी झाल्याने प्रवासी ३ ते ४ तासांपासून अडकले आहेत. येथील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने आणि वाहनांचा ओघ वाढल्याने प्रवाशांना या प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
advertisement
जर तुम्ही या मार्गांवरून प्रवास करणार असाल, तर पर्यायी मार्गांचा विचार करावा किंवा प्रवासाचे नियोजन काही काळ पुढे ढकलण्याबाबत विचार करा. सोबत पुरेसे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत ठेवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवासाचा प्लॅन बदला! पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसह अहमदाबाद हायवेवर वाहनांच्या 4 ते 7 किमीपर्यंत रांगा; भर उन्हात प्रवाशांचे हाल
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement