सातव्या मजल्यावर अडकली लिफ्ट; तरुण बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतानाच मृत्यूनं गाठलं, पुण्यात 11 जणांवर गुन्हा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दिनेश सुरंगे हे लिफ्टने खाली जात असताना तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. दिनेश यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अचानक लिफ्टची मुख्य केबल तुटली.
पिंपरी : तळेगाव दाभाडे येथून एक धक्कादायक घटना समोर आली. यात 'निसर्ग हौसिंग सोसायटी'मध्ये लिफ्टची केबल तुटून झालेल्या भीषण अपघातात दिनेश सुरंगे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लिफ्टच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक वारके यांच्यासह ११ सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश सुरंगे हे लिफ्टने खाली जात असताना तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. दिनेश यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अचानक लिफ्टची मुख्य केबल तुटली. क्षणात लिफ्ट अत्यंत वेगाने सातव्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली. या भीषण धडकेत दिनेश गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे बंधू रितेश रामा सुरंगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
advertisement
सोसायटीच्या लिफ्टची नियमित तपासणी आणि देखभाल करणे ही जबाबदारी कार्यकारिणीची असते. मात्र, निसर्ग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी चेअरमन पुंडलिक वारके, दीपक हेंद्रे, विनायक खोराटे, नीलेश गवळी, प्रवीण श्रीवास यांच्यासह एकूण ११ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. लिफ्टच्या तांत्रिक तपासणीचा अहवाल आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 7:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सातव्या मजल्यावर अडकली लिफ्ट; तरुण बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतानाच मृत्यूनं गाठलं, पुण्यात 11 जणांवर गुन्हा








