दोघं सोबतच काम करायचे; मग त्या दिवशी काय घडलं? पुण्यात सहकाऱ्यानंच तरुणाला इमारतीवरून ढकलून मारलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रागाच्या भरात एका मजुराने आपल्याच सहकाऱ्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवड: घर दुरुस्तीच्या कामावर असलेल्या दोन मजुरांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, काही वेळातच हा वाद इतका विकोपाला गेला, की त्यात एकाने थेट दुसऱ्याचा जीवच घेतला. या भांडणाचे रूपांतर एकाच्या मृत्यूत झाले आहे. चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी (२९ मार्च) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात एका मजुराने आपल्याच सहकाऱ्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं प्रकरण काय?
केशवकुमार महतो (वय २६, मूळ रा. बिहार, सध्या रा. चिखली) असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आणि संशयित आरोपी पुनीत राम नक्षत्र शुक्ला (वय २८, मूळ रा. बिहार) हे दोघेही वाल्हेकरवाडी येथे एका घराच्या दुरुस्तीचे काम करत होते. कामाच्या दरम्यान त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पुनीतने संतापून केशवकुमारला दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिलं. उंचावरून पडल्याने केशवकुमारला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून संशयित आरोपी पुनीत शुक्ला याला तातडीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा (IPC 302/BNS) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
एकाच राज्यातील असूनही केवळ क्षुल्लक वादातून एका तरुणाने दुसऱ्याचा अशाप्रकारे जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 6:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दोघं सोबतच काम करायचे; मग त्या दिवशी काय घडलं? पुण्यात सहकाऱ्यानंच तरुणाला इमारतीवरून ढकलून मारलं










