IPL 2026 : रोहितला शतकापासून रोखलं, ज्याला संधी दिली नाही त्याने 5 वर्षांनी घेतला बदला, कोण आहे केकेआरचा तो स्टार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्मा हमखास त्याचं शतक पुर्ण करू शकला असता. पण केकेआरच्या एका खेळाडूमुळे त्याच शतक हुकलं होतं. विशेष म्हणजे हा खेळाडू मुंबई इडियन्सच्या संघात होता.त्यामुळे या खेळाडूने पाच वर्षानी आपला बदला घेतला आहे.
IPL 2026 : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने कोलकत्ताने दिलेले 221 धावांच भलं मोठं लक्ष्य 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेटने जिंकला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने 14 वर्षाचा वनवास संपवला आहे.तसेच मुंबईच्या या विजयात 81 धावा करणारा रायन रिकल्टन आणि 78 धावा करणारा रोहित शर्मा मॅचविनर ठरला होता. या सामन्यात रोहित शर्मा हमखास त्याचं शतक पुर्ण करू शकला असता. पण केकेआरच्या एका खेळाडूमुळे त्याच शतक हुकलं होतं. विशेष म्हणजे हा खेळाडू मुंबई इडियन्सच्या संघात होता.त्यामुळे या खेळाडूने पाच वर्षानी आपला बदला घेतला आहे.
खरं तर रोहित शर्मा 78 धावांवर खेळत होता.तो ज्याप्रमाणे खेळत होता ते पाहून ते शतक ठोकेल असेच वाटत होते. पण वैभव अरोराच्या 12 व्या ओव्हरला घात झाला.त्याचं झालं असं की षटकार मारायच्या प्रयत्नात रोहित शर्मा कॅच आऊट झाला. फिल्डींग ला उभ्या असलेल्या अनुकूल रॉयने उलटा पळत भन्नाट कॅच घेतली होती.ही कॅच खूपच अवघड होती पण त्याने ती घेतली आहे.
advertisement
हा अनुकूल रॉय तोच खेळाडू आहे, जो एकेकाळी मुंबईच्या संघात होता. अनुकूल रॉल 2018 ते 2021 सालपर्यंत मुंबईकडून आयपीएल खेळला पण त्याला एकदाही सामन्यात खेळायची संधी मिळाली नाही.त्यामुळे मुंबईचा कॅप्टन हा रोहित शर्मा होता.त्यामुळे आता याच गोष्टीचा बदला अनुकूल रॉयने त्याची कॅच घेऊन आणि शतक रोखून केला आहे.
Anukul Roy with a stunner of a catch 👏pic.twitter.com/nzlGGWwusL
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 29, 2026
advertisement
कोलकत्ता नाईट राईडर्सने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने चांगली सूरूवात केली होती.रोहित शर्माने सूरूवातीपासून आक्रामक खेळी करत 23 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होते. त्याच्या पाठोपाठ रिकल्टने देखील 25 बॉलमध्ये अर्धशतकीय खेळी केली होती.यानंतरही दोघांनी आक्रामक खेळी सूरूच ठेवली होती.पण पुढे जाऊन रोहित शर्मा 38 बॉलमध्ये 78 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 6 चौकार लगावले होते.
advertisement
रोहित बाद होताच सूर्या मैदानात आला पण तो 16 धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला होता. या दरम्यान चांगला फॉर्मात असलेला रायन रिकल्टन 43 बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली होती.त्यानंतर कॅप्टन हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा मैदानात होते.पण मुंबई विजयानजीक कर असताना तिलक वर्मा 20 धावांवर बाद झाला. तर हार्दिक पांड्याने शेवटी औपचारीक धावा पूर्ण करत मुंबईला हा सामना जिंकून दिला.
advertisement
आयपीएल मधला हा पहिलाच सामना जिंकून मुंबई इंडियन्सने 14 वर्षांच्या वनवास संपवला आहे. कारण मागच्या 14 वर्षात मुंबईला एकदाही आयपीएलचा पहिला सामना जिंकता आला नव्हता. पण मुंबईने हा सामना जिंकून आता वनवास संपवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 12:02 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : रोहितला शतकापासून रोखलं, ज्याला संधी दिली नाही त्याने 5 वर्षांनी घेतला बदला, कोण आहे केकेआरचा तो स्टार









