advertisement

हे अनफेअर एव्हिक्शन! प्रभू शेळकेच्या पाठोपाठ TOP 8 मधून बाहेर पडला 'हा' तगडा स्पर्धक, चाहत्यांना राग अनावर

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Week 11 Elimination: सोशल मीडिया स्टार प्रभू शेळकेला कालच्या एपिसोडमध्ये एव्हिक्ट करण्यात आले होते. मात्र, आज रविवारच्या भाऊचा धक्कामध्ये आणखी एक शॉकिंग एव्हिक्शन पार पडले.
1/7
बिग बॉस मराठी ६ चा यंदाचा आठवडा सर्वांत जास्त भावूक करणारा ठरला आहे. या आठवड्यात स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात आले होते. यावेळी सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. घरच्यांना भेटण्याचा आनंद निवळत नाही, तोच स्पर्धकांना मोठा झटका बसला आहे.

2/7
या आठवड्यातून दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सोशल मीडिया स्टार प्रभू शेळकेला कालच्या एपिसोडमध्ये एव्हिक्ट करण्यात आले होते. मात्र, आज रविवारच्या भाऊचा धक्कामध्ये आणखी एक शॉकिंग एव्हिक्शन पार पडले.

3/7
या आठवड्यात केवळ एक नाही, तर डबल एव्हिक्शन झालं असून, दोन तगड्या स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. प्रभू शेळकेनंतर घरात वाईल्ड कार्ड म्हणून आलेला स्पर्धक संकेत पाठकला घराबाहेर पडावे लागले आहे.

4/7
या आठवड्यात सात स्पर्धक डेंजर झोनमध्ये होते. मात्र, सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे प्रभू शेळके आणि संकेत पाठक या दोघांचा प्रवास संपला आहे. रितेशने आधीच स्पष्ट केलं होतं की, या वेळी एका गटातून एक सदस्य बाहेर जाईल. त्यानुसार 'काटा गँग'मधील प्रभू शेळके आणि 'टोळी'मधील संकेत यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

5/7
दरम्यान, संकेत पाठकच्या एव्हिक्शनने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. संकेत हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे, त्याचबरोबर त्याचा घरातील खेळही चांगला होता. असे असताना, त्याचं घराबाहेर जाणं प्रेक्षकांच्या पचनी पडलेलं नाही. चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत, याला अनफेअर एव्हिक्शन म्हटलं आहे.

6/7
दरम्यान, या डबल धक्क्यानंतर घरात आता केवळ ८ सदस्य उरले आहेत. प्रभू आणि संकेत घराबाहेर आल्यानंतर राकेश बापट, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने, सागर कारंडे, राखी सावंत, रेवा कौरसे आणि तन्वी कोल्ते हे आठ स्पर्धक आता ट्रॉफीसाठी लढताना दिसणार आहेत.

7/7
विशेष म्हणजे, तन्वी कोल्ते घराची कॅप्टन झाल्याने ती आधीच १३ व्या आठवड्यासाठी सुरक्षित झाली आहे. आता उरलेल्या खेळाडूंमध्ये फिनालेच्या ट्रॉफीसाठी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement