advertisement

युद्धात इस्रायलचं सैन्य थकलंय? युद्धादरम्यान IDF नं फडकावला लाल झेंडा

Last Updated:

शत्रूच्या विरोधात काळ बनून आलेलं सैन्य म्हणजे आयडीएफ मात्र इराणविरुद्धच्या युद्धात आयडीएफला घाम फुटलाय का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

News18
News18
मुंबई :  इस्रायल आणि अमेरिकेनं लादलेल्या युद्धाविरोधात इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याला उत्तर देताना इस्रायलचं मोठं नुकसान झाल्याचं समोर येतंय आहे. इस्रायल सध्या अनेक आघाड्यांवर लढत असल्यानं त्यांच्या लष्करात मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा असून इस्रायली सैन्य मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळे नव्या भरतीची तातडीची निकड इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एयाल जमीर यांनी व्यक्त केली.
IDF म्हणजेच इस्रायल डिफेन्स फोर्सेस....जगातील अशी लष्करी ताकद जिनं कधी युद्धाच्या मैदानात पराभवाचा सामना केला नाही. शत्रूच्या विरोधात काळ बनून आलेलं सैन्य म्हणजे आयडीएफ मात्र इराणविरुद्धच्या युद्धात आयडीएफला घाम फुटलाय का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. इराणविरोधातील युद्धामध्ये आयडीएफच्या प्रमुखांनी लाल झेंडा फडकावला आहे. 10 लाल झेंडे म्हणजेच युद्ध सुरु असताना आयडीएफसाठी धोक्याची घंटा म्हणजेच आणीबाणीचे संकेत आहे.
advertisement
इस्रायल डिफेंस फोर्सेसचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल एयाल जमीन यांनी सांगितलं की, IDF मध्ये जवानांची मोठी कमतरता आहे ज्यामुळे लष्कर कधीही कमकुवत होऊन कोलमडू शकतं लष्कराच्या तयारीवर मोठं संकट घोंगावतं आहे.
इस्रायलचं लष्कर आधी गाझाच्या मोहिमेत व्यस्त होतं त्यानंतर आयडीएफनं इराणविरोधातील युद्धात मोर्चा सांभाळला आणि यातच आता तिसरा संघर्ष सुरु झालाय तो म्हणजे लेबनॉ़नमध्ये.....जिथे हिजबुल्लाहला मुळापासून उखडून टाकण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे आणि याच तीन आघाड्यांवर लढताना आयडीएफमध्ये सैनिक कमी पडू लागलेत..
advertisement

आयडीएफमध्ये 1 लाख 70 हजार अॅक्टिव सैनिक

आयडीएफमध्ये 1 लाख 70 हजार अॅक्टिव सैनिक आहेत. सध्याच्या युद्धपरिस्थितीत 15 हजार सैनिकांची कमतरता असल्याचं IDF कडून सांगितलं जातं आहे. युद्धादरम्यान सैन्य कमी पडणं काही नवीन गोष्ट नाही. युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान पुतिन आणि झेलेन्स्कींच्या ताफ्यात सैन्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र युद्ध सुरु असताना जाहीररित्या आयडीएफनं लाल झेंडा फडकावणं आश्चर्यचकित करणारं आहे. खरंतर ही इस्रायलची एखादी रणनीतीही असू शकते जेणेकरुन इराणला वाटेल की इस्रायल कमकुवत होतोय आणि ते इस्रायलला कमी लेखण्याची चूक करतील.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
युद्धात इस्रायलचं सैन्य थकलंय? युद्धादरम्यान IDF नं फडकावला लाल झेंडा
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement