Hardik Pandya : 12 कोटींची मर्सिडीज, पण मुंबईच्या रस्त्याने धोका दिला... घाबरलेल्या हार्दिकने ब्रेक मारला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर आणि कर्णधार हार्दिक पांड्या त्याची नवीन 12 कोटींची फरारी चालवताना मुंबईच्या रस्त्यांवर दिसला.
मुंबई : मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर आणि कर्णधार हार्दिक पांड्या त्याची नवीन 12 कोटींची फरारी चालवताना मुंबईच्या रस्त्यांवर दिसला. फरारी सारख्या स्पोर्ट्स कारना ग्राऊंड क्लियरन्स खूप कमी असतो, त्यातच मुंबईमध्ये ठिकठिकाणी स्पीड ब्रेकरही आहेत. अशाच एका स्पीड ब्रेकरपासून आपली फरारी वाचवताना हार्दिक पांड्याच्या नाकी नऊ आले. स्पीड ब्रेकरवर हार्दिक पांड्याची फरारी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
स्पीड ब्रेकरवर कार अडकल्यानंतर हार्दिक कारच्या खालचा भाग खराब होऊ नये म्हणून हार्दिकने प्रयत्न केले. स्पीड ब्रेकरवरून कार सरळ नेण्याऐवजी हार्दिकने तिरकी केली आणि अत्यंत सावध पद्धतीने स्पीड ब्रेकर पार केला.
NICE GESTURE BY HARDIK PANDYA WITH POLICE OFFICER
- Hardik struggled with huge speed breakers in his ₹12 crore Ferrari
Had to cross them at an angle, got a bit frustrated, Still stopped ahead to greet police officers with a handshake pic.twitter.com/0vhdYPvWAc
— Sam (@Cricsam01) March 28, 2026
advertisement
पोलीस अधिकाऱ्यांची भेट
स्पीड ब्रेकर पार केल्यानंतर हार्दिक पांड्याने तिथे उपस्थित असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंबईच्या रस्त्यांवर एवढी महागडी आणि दुर्लभ कार पाहून पोलीसही बघत बसले आणि त्यांनी हार्दिकचं स्वागत केलं. हार्दिक पांड्याच्या या व्हिडिओवर चाहते मजेशीर कमेंट करत आहे.
सहाव्या ट्रॉफीसाठी मुंबई मैदानात
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 च्या त्यांच्या मिशनला सुरूवात करत आहे. पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर केकेआरविरुद्ध होत आहे. मागच्या 5 वर्षांपासून मुंबईला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मागच्या मोसमात मुंबईची टीम क्वालिफायर-2 पर्यंत पोहोचली होती. मुंबईकडे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या एवढेच वर्ल्ड कप विजेते चॅम्पियन आहेत, त्यामुळे सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई प्रबळ दावेदार मानली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 8:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : 12 कोटींची मर्सिडीज, पण मुंबईच्या रस्त्याने धोका दिला... घाबरलेल्या हार्दिकने ब्रेक मारला, Video









