advertisement

पॅकअप झालं आणि मृत्यूने जखडलं! शूटिंग दरम्यान 43 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याचा दुर्दैवी अंत, इंडस्ट्रीवर शोककळा

Last Updated:
प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंग दरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
1/7
मनोरंजन विश्वाला हादरा बसला आहे. नुकतीच एक बातमी समोर आली असून यामुळे चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंग दरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाला असून त्याच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

2/7
हा अभिनेता दुसरा कोणी नसून बंगाली मनोरंजन विश्वात लोकप्रिय असलेला राहुल अरुणोदय बॅनर्जी आहे. अवघ्या ४३ व्या वर्षी राहुलचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांना धक्का बसला आहे. रविवारी ओडिशामधील तालसरी समुद्रकिनाऱ्यावर ही हृदयद्रावक घटना घडली.

3/7
‘भोले बाबा पार करेगा’ या मालिकेच्या शूटिंगसाठी राहुल पश्चिम बंगालच्या दिघा जवळ असलेल्या तालसरी समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ च्या सुमारास शूटिंग पूर्ण झालं होतं. त्यानंतर संपूर्ण टीम परतीच्या प्रवासाला निघण्याची तयारी करत असतानाच, राहुल काही वेळासाठी समुद्रात उतरला होता.

4/7
राहुल समुद्रात पोहण्यासाठी उतरला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो लाटांसोबत वाहून गेला. राहुल पाण्यात बेपत्ता झाल्याचं समजताच तिथे एकच खळबळ उडाली. सुमारे एक तास त्याचा शोध सुरू होता.

5/7
अखेर तासाभराने लाइफ गार्ड्सच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

6/7
या मालिकेत राहुलच्या काकांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते भास्कर बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले,
या मालिकेत राहुलच्या काकांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते भास्कर बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "आम्ही सर्वजण शूटिंग संपवून निघण्याच्या तयारीत होतो. ३ वाजता पॅकअप झालं होतं. राहुल समुद्रात गेला आणि अचानक तो दिसेनासा झाला. सुमारे अर्ध्या तासानंतर आम्हाला ही दुःखद बातमी मिळाली. राहुलने कोणतीही नशा केली नव्हती किंवा तिथे कोणताही गैरप्रकार घडला नाही, हा निव्वळ एक अपघात होता."
advertisement
7/7
राहुल अरुणोदय बॅनर्जी हा बंगाली टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा होता. त्याच्या सहजसुंदर अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी राहुलचा असा अंत होणं, हे इंडस्ट्रीसाठी मोठं नुकसान मानले जात आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement