Karnavati Express: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; कर्णावती एक्स्प्रेसच्या टर्मिनसमध्ये बदल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Karnavati Express News : पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते वटवा- अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेसच्या तात्पुरता बदलला आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक...
मुंबई: मुंबई- अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर धावणारी मुंबई सेंट्रल ते वटवा- अहमदाबाद आणि वटवा- अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल अशी मार्गावर धावणारी एक्सप्रेसच्या मार्गांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे ही प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणता येईल. काही दिवसांसाठीच एक्सप्रेसच्या रूटमध्ये बदल केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत, प्रवाशांना महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
12933 डाऊन आणि 12934 अप मुंबई सेंट्रल ते वटवा- अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल मार्गावर धावणारी कर्णवती एक्सप्रेस वांद्रा टर्मिनसवरून धावत आहे. ही ट्रेन 26 जानेवारी 2026 पासून मुंबई सेंट्रलच्या ऐवजी वांद्रा टर्मिनसपर्यंतच धावत आहे. ही एक्सप्रेस 27 एप्रिलपर्यंत वांद्रा टर्मिनसपर्यंत धावणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वेने यापूर्वी 26 जानेवारी ते 7 मार्च या कालावधीसाठी हा बदल जाहीर केला होता. पण आता त्या कालावधीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या बदलामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी प्रवासापूर्वी आपल्या ट्रेनबद्दल माहिती घेत आहेत.
advertisement
Due to operational reasons, Western Railway has extended the temporary change in the terminal station of Train No. 12933/12934 Mumbai Central - Vatva/Ahmedabad - Mumbai Central Karnavati Express.
The train will continue to run from Bandra Terminus instead of Mumbai Central till…
— Western Railway (@WesternRly) March 29, 2026
advertisement
गाडी क्रमांक 12933 दुपारी 01:55 वाजता वांद्रे टर्मिनसवरून सुटेल, तर गाडी क्रमांक 12934 दुपारी 12:30 वाजता वांद्रे टर्मिनसवर पोहोचेल. बोरिवली आणि वटवा/ अहमदाबाद दरम्यानच्या उर्वरित वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. ही गाडी वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, सुरत, भरूच जंक्शन, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन, नडियाद जंक्शन आणि वटवा या १० स्थानकांवर थांबा आहे. अधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केले की, इतरत्र स्थानकांवरील वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. इतर सर्व कामकाज जशाच्या तसे कायम राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 9:48 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Karnavati Express: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; कर्णावती एक्स्प्रेसच्या टर्मिनसमध्ये बदल








