Gole Bhat Recipe : पोळी-भाजी खायचा कंटाळा आलाय, बनवा विदर्भ स्पेशल गोळे भात! पोट भरेलच, मनही होईल तृप्त
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Vidarbha special gole bhat recipe : कंटाळवाण्या संध्याकाळी तुम्ही हा विदर्भ स्पेशल गोळे भात कढीसोबत बनवून सर्वांना सर्व्ह केलात तर तो सगळ्यांना नक्की आवडेल.
मुंबई : रोज रोज भाजी पोळी खाऊन कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी आपण बाहेरचं काहीतरी मागवतो किंवा मग घरची सोपा सोपा वरण-भात नाहीतर खिचडी बनवतो. पण खिचडी, डाळ भातही नेहमीचाच.. आज आम्ही तुम्हाला झटपट बनणारी भाताचीच एक सोपी पण युनिक रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी म्हणजे विदर्भ स्पेशल गोळे भात.
कंटाळवाण्या संध्याकाळी तुम्ही हा विदर्भ स्पेशल गोळे भात कढीसोबत बनवून सर्वांना सर्व्ह केलात तर तो सगळ्यांना नक्की आवडेल. ही रेसिपी stylishachari या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली गेली आहे.
गोळेभात आणि कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
हा गोळे भात कढी बनवण्यासाठी तुम्हाला दही, मीठ, तांदूळ, जिरेपूड, ओवा, हिंग, पांढरे तीळ, लाल तिखट, हळद, तेल, कोथिंबीर, बेसन, लसूण, आलं, जिरं, हिंग, साखर आणि हिरवी मिरची हे साहित्य लागेल.
advertisement
असा बनवा विदर्भ स्पेशल गोळेभात आणि कढी..
- सर्वात आधी एका पसरट पातेल्यामध्ये पाणी गरम करा आणि त्यामध्ये थोडं दही आणि मीठ टाकून ते मिक्स करा.
- त्यानंतर यामध्ये धुतलेले तांदूळ टाका. हा भात कव्हर करून अर्धा शिजवायचा आहे.
- त्यानंतर एका भांड्यात बेसन घ्या. त्यामध्ये जिरेपूड, ओवा, हिंग, पांढरे तीळ, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल आणि कोथिंबीर टाकून एकत्र करून घ्या.
advertisement
- त्यानंतर यामध्ये थोडं दही आणि पाणी घालून त्याची कणिक मळून घ्या. या कणकेचे मुटकुळे किंवा फुनके तयार करून घ्या.
- आता अर्ध्या शिजलेल्या भातामध्ये हे फुनके टाका आणि झाकून भात पूर्ण शिजेपर्यंत ते शिजवून घ्या.
- दुसरीकडे आपल्याला कढी तयार करायची आहे.
- यासाठी एका खलबत्त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची ठेचून घ्या.
advertisement
- आता एका भांड्यात दही घ्या आणि त्यामध्ये बेसन, कुटलेलं आलं लसनाचं मिश्रण, हळद थोडी साखर आणि थोडंसं मीठ टाकून छान मिक्स करून घ्या.
- यामध्ये पाणी टाकून पुन्हा मिक्स करा.
- आता गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, हिंग आणि तयार केलेलं मिश्रण टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
advertisement
- शेवटी भातासाठी तडका तयार करायचा आहे. यासाठी एका तडका पॅनमध्ये तेल टाका आणि त्यात हिंग, लसूण आणि सुकलेली लाल मिरची टाका. हा तडका भातावर पेरून घ्या.
advertisement
अशाप्रकारे तुमचा गोळा भात आणि कढी तयार होते. हे घरातील सदस्यांना सर्व्ह करा, त्यांना नक्कीच आवडेल. तिखट थोडं कमी टाकाल तर ही डिश मुलंही आवडीने खातील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Gole Bhat Recipe : पोळी-भाजी खायचा कंटाळा आलाय, बनवा विदर्भ स्पेशल गोळे भात! पोट भरेलच, मनही होईल तृप्त









