advertisement

MI vs KKR : 25 कोटींच्या कॅमरून ग्रीनला बॉलिंग का दिली नाही? कॅप्टन अजिंक्यने एका वाक्यात विषय संपवला! कुणावर फोडलं खापर?

Last Updated:

Ajinkya Rahane on Cameron Green Bowling : केकेआर टीममधील महत्त्वाचा ऑलराउंडर कॅमेरून ग्रीन सध्या बॉलिंग का करत नाही? या प्रश्नावर अजिंक्य रहाणेने थेट उत्तर देणं टाळलं.

Ajinkya Rahane on Cameron Green Bowling
Ajinkya Rahane on Cameron Green Bowling
MI vs KKR, Ajinkya Rahane : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडेवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 220 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला चेस करणं पलटणसाठी आव्हानात्मक होतं. पण रोहित शर्मा आणि रायन रिक्ल्टन यांनी अफलातून बॅटिंग करत डोंगर सर केला. मॅच हातातून जात होती, तरी देखील कॅमरून ग्रीनला ओव्हर का दिली जात नाही? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर कॅप्टन अजिंक्य रहाणे याने उत्तर दिलंय.

कॅमेरून ग्रीन बॉलिंग का करत नाही?

टीममधील महत्त्वाचा ऑलराउंडर कॅमेरून ग्रीन सध्या बॉलिंग का करत नाही? या प्रश्नावर अजिंक्य रहाणेने थेट उत्तर देणं टाळलं. "या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारावे लागेल," असं म्हणत अजिंक्य रहाणे याने बॉल ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या कोर्टात टोलवला. ग्रीनने लवकर बॉलिंग सुरू केल्यास टीमचे कॉम्बिनेशन अधिक संतुलित होईल आणि विजयाचे समीकरण सोपे होईल, अशी आशा देखील अजिंक्य रहाणे याने व्यक्त केली.
advertisement

बॉलर्सवर पराभवाचं खापर फोडलं

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना मॅचमध्ये 220 ते 225 रन्सचा टार्गेट पुरेसा होतं, असं मत रहाणेने बोलून दाखवलं. केकेआरच्या बॅटिंग फळीने दमदार कामगिरी केली असली तरी, बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये अनुभवाची कमतरता दिसून आली. वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागी सारख्या तरुण बॉलरसाठी ही एक मोठी 'लर्निंग कर्व' असून या अनुभवातून ते नक्कीच सुधारणा करतील, असं म्हणत अजिंक्य रहाणे याने बॉलर्सवर पराभवाचं खापर फोडलं. त्यावेळी त्याने स्वत:च्या फिटनेसवर देखील भाष्य केलं.
advertisement

अजिंक्य रहाणेने मैदान का सोडलं?

दरम्यान, मुंबईतील प्रचंड आर्द्रतेमुळे दोन्ही पायांच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येत असल्याने मैदानावर टिकून राहणं आव्हानात्मक असतं, असं अजिंक्य रहाणे म्हणाला. 37 व्या वर्षीही मी अजून तरुण असून माझ्या बॅटिंगमधील फॉर्मवर मी समाधानी असल्याचं अजिंक्य रहाणे याने मिश्किलपणे सांगितलं. त्यामुळे तो आगामी सामन्यात खेळताना दिसेल, यात शंका नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs KKR : 25 कोटींच्या कॅमरून ग्रीनला बॉलिंग का दिली नाही? कॅप्टन अजिंक्यने एका वाक्यात विषय संपवला! कुणावर फोडलं खापर?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement