advertisement

Ashwini Bhide: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती जवळपास निश्चित

Last Updated:

अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी निवड झाल्यावर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरणार आहे

News18
News18
मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता आयुक्तपदासाठी हालचालींना वेग आला आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिड़े यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. अद्याप अश्विनी भिडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. पण, औपचारिकता बाकी आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली होती. त्यानंतर अश्विनी भिडे यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
अश्विनी भिडे या कडक आणि परिणामकारक प्रशासनशैलीसाठी ओळखल्या जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) सचिव म्हणून कामाचा अनुभव आहे. विशेषत: मुंबई मेट्रो प्रकल्पात भूमिगत मेट्रो कामांमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. यापूर्वी BMC मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम केले असल्याने महानगरपालिका कारभाराचा सखोल अनुभव आहे.
advertisement
मुंबईसारख्या मोठ्या शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि प्रकल्पांची गती वाढवण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे प्रशासनात शिस्त आणि प्रकल्पांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अश्विनी भिडे ठरणार पहिल्या महिला आयुक्त
अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी निवड झाल्यावर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरणार आहे. अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची निवड झाली तर BMC च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त होणार आहे.  विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ 31 मार्च 2026 रोजी संपणार आहे.  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL)च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पायाभूत प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कामगिरी भिंडेनी केली आहे.  अंतिम निवडीत संजय मुखर्जी आणि असीम गुप्ता यांची नावे चर्चेत होती. मात्र अनुभव आणि कामकाजाच्या शैलीमुळे भिडे यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे.  शहरातील पायाभूत सुविधा व प्रशासनातील महत्त्वाचे प्रकल्प हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.  आयुक्तपदी निवड झाल्यास 2030 पर्यंत पूर्ण कार्यकाळ अपेक्षित आहे. ही नियुक्ती मुंबईतील प्रशासन आणि पायाभूत विकासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ashwini Bhide: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती जवळपास निश्चित
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement