advertisement

Iran Plane Crash: दिल्लीकडे निघणार तेच अमेरिकेच्या सैन्याने इराणमध्ये प्रवासी विमान पाडलं, भारतात का येणार होतं?

Last Updated:

महान एअरलाईन्सचं हे एक खासगी विमान होतं. मंगळवारी या विमानाने मसहद इथून टेकऑफ करणार होतं.

News18
News18
इराण आणि इस्त्रायलमध्ये एकीकडे युद्ध पेटलं आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, त्यामुळे युद्धविरामासाठी चर्चाही सुरू झाली आहे. पण, पडद्याआड चर्चा जरी सुरू असली तरी मैदानात हल्ले काही केल्या थांबत नाहीये. अशातच भारताकडे येणाऱ्या एका इराणी खासगी विमानाला अमेरिकेनं सैन्याने जमीनदोस्त केलं आहे. अमेरिकन सैन्याने विमानतळावरच हल्ला चढवला, या हल्ल्यात महान एअरलाईन्सचं विमान उद्ध्वस्त झालं आहे. हे विमान मशहदहून दिल्लीला येणार होतं. पण, अमेरिकनं सैन्यानं महान एअरलाईन्सचं विमान टेकऑफच्या आधी मिसाईलने मारा करून उडवलं.
दिल्लीला का येत होतं हे विमान? 
महान एअरलाईन्सचं हे एक खासगी विमान होतं. मंगळवारी या विमानाने मसहद इथून टेकऑफ करणार होतं. मशहदहून हे विमान दिल्लीला येणार होतं. या विमानामध्ये औषधी होती, जी भारतीय लोकांनी विकत घेतली होती. या विमानाच्या मदतीने जवळपास ११ टन मदत ही तेहरानला पोहोचणार होती. पण, याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, इराणकडे असलेल्या एअरफोर्स आणि जहाजं नष्ट केली आहे. पण असं असताना एक खासगी प्रवासी वाहतूक करणारं विमान मसहद इथून टेकऑफ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकनं सैन्याला मिळाली. त्यानंतर गुप्तहेरांकडून माहिती गोळा करून अमेरिकेनं सैन्याने या विमानावर मिसाईलने हल्ला केला आणि नष्ट केलंय.
advertisement
रविवारपर्यंत इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे १६ ते १७ विमानं नष्ट झाली आहे. या हल्ल्यानंतर इराणमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आता खासगी प्रवाशी विमानांना सुद्धा टार्गेट केलं जाणार असेल तर औषधी आणि अन्नधान्य सुद्धा इराणला गोळा करावं लागणार आहे.
भारतातून लोकांची मदत
दरम्यान, इराण आणि इस्त्रायलच्या युद्धामध्ये भारतातून काही लोकांनी इराणसाठी आंदोलनं केली आणि मदत देण्यासाठी पुढेही आले. इराण दुतावासामध्ये भारतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे. एवढंच नाहीतर मागील आठवड्यात इराणी दुतावासाने QR कोड सुद्धा प्रसिद्ध केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं हल्ला करून पाडलेलं महान एअरलाईन्सचं विमान हे इराणच्या अधिकाऱ्यांनी बूक केलं होतं. आता इराण पुन्हा एकदा दुसऱ्या कोणत्या मार्गाने विमान पाठवण्याच्या तयारीत आहे जे विमान भारतातून औषधी आणि इतर साहित्य घेऊन येईल.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran Plane Crash: दिल्लीकडे निघणार तेच अमेरिकेच्या सैन्याने इराणमध्ये प्रवासी विमान पाडलं, भारतात का येणार होतं?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement