advertisement

Crime : फ्रिजमध्ये प्रेयसीची बॉडी, डोकं मात्र मिळालंच नाही... श्रद्धा वालकर प्रकरणापेक्षा भयंकर विशाखापटणमचा थरार

Last Updated:
ही गोष्ट आहे एका नौदल अधिकाऱ्याची आणि त्याच्या प्रेयसीची, ज्याचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला.
1/8
आजच्या डिजिटल युगात डेटिंग ॲप्स हे जोडीदार शोधण्याचे एक सोपे माध्यम बनले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर आपण अनोळखी व्यक्तींशी जोडले जातो, मैत्री होते आणि काही वेळा या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. पण, कधीकधी हेच डिजिटल प्रेम एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. विशाखापटणममध्ये नुकतीच एक अशी घटना घडली आहे, जी ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. एखाद्या सिनेमातील क्राइम थ्रिलर शोभावा असा थरार प्रत्यक्षात घडला आहे. या घटनेने पुन्हा एकदा दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या भीषण आठवणी ताज्या केल्या आहेत.

2/8
ही गोष्ट आहे एका नौदल अधिकाऱ्याची आणि त्याच्या प्रेयसीची, ज्याचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला.
ही गोष्ट आहे एका नौदल अधिकाऱ्याची आणि त्याच्या प्रेयसीची, ज्याचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला.
advertisement
3/8
चिंताडा रवींद्र (35) हा भारतीय नौदलात (INS Dega) कार्यरत असलेला अधिकारी. 2021 मध्ये त्याची ओळख 29 वर्षीय पोलिपल्ली मौनिका हिच्याशी Mingle नावाच्या डेटिंग ॲपवरून झाली. सुरुवातीला मैत्री आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. विशाखापटणममधील विविध उद्याने आणि चित्रपटगृहांमध्ये हे दोघे वारंवार भेटू लागले. मात्र, 2024 मध्ये रवींद्रचे लग्न दुसऱ्या महिलेशी झाले आणि इथूनच या नात्यात मिठाचा खडा पडला.

4/8
काही दिवसांपूर्वीच रवींद्रची पत्नी आपल्या माहेरी विझियानगरम येथे गेली होती. घरात कोणीही नव्हतं आणि हीच वेळ मौनिकाला भेटण्यासाठी योग्य आहे, असे रवींद्रला वाटले. त्याने रविवारी दुपारी मौनिकाला आपल्या घरी बोलावले. मात्र, सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, रवींद्रने मौनिकाचा गळा आवळून तिचा खून केला.

5/8
श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्तीखुनानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रवींद्रने जे केले, ते ऐकून पोलीसांनाही धक्का बसला. त्याने ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून एक चाकू मागवला आणि मौनिकाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले.

6/8
त्याने डोके, पाय आणि हात धडापासून वेगळे केले.पाय आणि कमरेचा भाग एका ट्रॉली बॅगेत भरला.
शरीराचा मुख्य भाग (Torso) फ्रिजमध्ये लपवून ठेवला.
जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना घरामध्ये आणि फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले, पण मौनिकाचे डोके अद्याप सापडलेले नाही.
त्याने डोके, पाय आणि हात धडापासून वेगळे केले.पाय आणि कमरेचा भाग एका ट्रॉली बॅगेत भरला.शरीराचा मुख्य भाग (Torso) फ्रिजमध्ये लपवून ठेवला.जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना घरामध्ये आणि फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले, पण मौनिकाचे डोके अद्याप सापडलेले नाही.
advertisement
7/8
पैशांचा व्यवहार की ब्लॅकमेलिंग?रवींद्रने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मौनिकाने त्याच्याकडून 3.5 लाख रुपये घेतले होते आणि ती वारंवार त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल त्याच्या पत्नीला सांगण्याची धमकी देत होती. लग्नानंतर होणाऱ्या या जाचाला कंटाळून त्याने आधीच या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

8/8
विशाखापटणम पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेपत्ता अवयवांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे. हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नात्यांमधील विश्वास जेव्हा टोकाच्या रागामध्ये बदलतो, तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुरक्षित राहा आणि अशा कोणत्याही जाळ्यात अडकण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement