advertisement

विरारमध्ये डोकं नसलेला मृतदेह पोत्यात आढळला, टॅटूमुळे नाव समोर; आंबे पाडा हादरला

Last Updated:

गोणी उघडताच समोर आलेले दृश्य पाहून पोलीसही चक्रावून गेले. गोणीत एका पुरुषाचे धड होते, मात्र त्याचे 'शिर' गायब होते.

News18
News18
मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत वसलेल्या पेल्हार परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीचा शिर नसलेला मृतदेह गोणीत बांधून फेकल्याचे उघडकीस आले आहे. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण वसई-विरार पट्ट्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारांनी केवळ हत्याच केली नाही तर ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे शिर धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा अघोरी प्रयत्न केला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबे पाडा परिसरात रविवारी एका तरुणाला संशयास्पद गोणी आढळून आली. महामार्गापासून साधारण एक किमी अंतरावरील निर्जन पायवाटेवर ही गोणी पडलेली होती. तरुणाने तत्परतेने पोलिसांना माहिती दिली  मात्र गोणी उघडताच समोर आलेले दृश्य पाहून पोलीसही चक्रावून गेले. गोणीत एका पुरुषाचे धड होते, मात्र त्याचे 'शिर' गायब होते.
advertisement

रागातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज

पोलिसांनी पंचनामा केला असता, मृतदेहाच्या हातावर अशोक सिंह असे नाव गोंदलेले (टॅटू) आढळून आले आहे. मृतदेहाची अवस्था पाहता, ही हत्या अत्यंत रागातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मारेकऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटू नये आणि गुन्ह्याचा सुगावा लागू नये, यासाठी शिर कापून ते दुसरीकडे विल्हेवाट लावली असावी, असा संशय बळकावला आहे.
advertisement

पुरावे गोळा करण्याचे काम सुरू

घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस निरीक्षक कांबळे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून  परिसरातून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. 'अशोक सिंह' नावाच्या बेपत्ता व्यक्तींची माहिती आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांतून घेतली जात आहे.
advertisement

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

निर्जन ठिकाणी मृतदेहाचे तुकडे करून फेकण्याच्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महामार्गालगतचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पेलत आहेत. हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे की व्यावसायिक वादातून झालेली हत्या या दिशेनेही तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
विरारमध्ये डोकं नसलेला मृतदेह पोत्यात आढळला, टॅटूमुळे नाव समोर; आंबे पाडा हादरला
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement