5 वर्षांनी गिरिजाच्या वडिलांचं झी मराठीवर कमबॅक, गिरिश ओक यांच्या नव्या मालिकेचा धमाकेदार प्रोमो रिलीज, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girish Oak Zee Marathi New Serial : 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले 'अभिजित राजे' म्हणजेच डॉ. गिरीश ओक पुन्हा एकदा 'झी मराठी' वाहिनीवर कमबॅक करत आहेत.
मुंबई: सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाल्या आहेत. अशातच मराठीतील दिग्गज अभिनेते गिरीश ओक आता नव्या मालिकेतून झी मराठीवर पुन्हा परतणार आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले 'अभिजित राजे' म्हणजेच डॉ. गिरीश ओक पुन्हा एकदा 'झी मराठी' वाहिनीवर कमबॅक करत आहेत. गिरीश ओक 'दीपज्योती' या नव्या मालिकेत ते एका करारी बापाच्या भूमिकेत दिसणार असून नुकतंच वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. एप्रिल महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'दीपज्योती' या मालिकेत दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या कुटुंबाची गोष्ट सांगितली जाणार आहे. एकीकडे एक सर्वसामान्य कुटुंब आहे, जिथे दोन बहिणी आपला मोठा भाऊ अभिजीतसोबत राहत आहेत. वडील दारूच्या आहारी गेल्याने भावाच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे. मात्र, घरात हालाखीची परिस्थिती असतानाही या भावा-बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. भावाला हातभार लावण्यासाठी ज्योतीला शिकून मोठं व्हायचं आहे.
advertisement
दोन कुटुंबांच्या दोन गोष्टी वेगवेगळ्या कहाण्या
दुसरीकडे पुरुषोत्तम यांचं कुटुंब घरंदाज आणि श्रीमंत असून त्यांना स्वराज, दीप आणि विराज ही तीन मुलं आहेत. तिन्ही मुलांपैकी मधला मुलगा दीप याच्यावर पुरुषोत्तम यांचा राग आहे. दीप लहान असताना त्याच्या आईचं निधन झालं. या घटनेसाठी पुरुषोत्तम दीपलाच जबाबदार मानतात. तेव्हापासून ते त्याचा तिरस्कार करतात. आईशिवाय वाढलेला दीप मोठेपणी दारूच्या आहारी जातो.
advertisement
एका 'धक्क्याने' बदलणार दोन आयुष्य!
प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, दीप एका दारूच्या दुकानातून दारू घेऊन पितो. तिथे त्याचा भाऊ त्याला घ्यायला येतो. पण दीप त्याची गाडी घेऊन निघून जातो. दारूच्या नशेत तो अभिजीतच्या रिक्षाला धडकतो. या धडकेत अभिजीत आणि त्याच्या बहिणीचा होणारा पती मृत्यूमुखी पडतो. त्यानंतर दोन्ही बहिणी आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित करतात. ज्योती भावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. तर तिची बहीण आपल्या होणाऱ्या पतीच्या मृत्यूचा सूड घेण्याचा निर्धार करते.
advertisement
advertisement
१३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता ही मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहे. मालिकेचं अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केलं असून संवाद इरफान मुजावर यांनी लिहिले आहेत आणि मालिकेचं दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केलं आहे. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते की नाही हे येणारा काळच सांगेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 9:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
5 वर्षांनी गिरिजाच्या वडिलांचं झी मराठीवर कमबॅक, गिरिश ओक यांच्या नव्या मालिकेचा धमाकेदार प्रोमो रिलीज, VIDEO








