advertisement

Weather Alert : ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, 30 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यातील 18 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास धोक्याचे असणार आहेत. विभागानुसार सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/7
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्याचा शेवटचा दिवस अवकाळी पावसाचा राहणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास धोक्याचे असणार आहेत. विभागानुसार सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
कोकण विभागातील मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाण्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातही 31 मार्चला अवकाळी पाऊस कोसळेल. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूरला यलो अलर्ट असेल. विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगराला वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून गारपीटही होऊ शकते. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार आणि धुळेला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल.

5/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांना अवकाळी तडाखा बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिवला यलो अलर्ट असेल. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.

6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिममध्ये उष्ण हवामान राहील. तर भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया आणि वर्ध्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून विजांचा धोका अधिक राहणार आहे.

7/7
31 मार्च रोजी राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाचा जोर राहणार असून गारपिटीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांनुसार पुढील काही दिवसही अशाच स्वरूपाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement